रावते यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर : पाचजण निलंबित
By admin | Published: July 19, 2016 01:07 AM2016-07-19T01:07:12+5:302016-07-19T01:12:10+5:30
दोन संघटनांतील वाद : मजकूरप्रकरणी दोघांवर, तर बैठकीत गोंधळ घातल्याप्रकरणी तिघांवर एस.टी. प्रशासनाची कारवाई
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक
अंतिम दर जाहीर केला आहे. कारखान्याच्या सभासदांना अंतिम दराचा २८८ रुपये हप्ता जाहीर
केला असून, एफआरपी पेक्षा जास्त
दर देऊन राज्यात विक्रमी २८०० रुपये दर दिला असल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे,
ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी केला आहे.
माळेगाव कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर नीरा खोऱ्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत जादा दर देण्यात कारखान्याने सातत्य
राखले आहे. कारखान्याला सरासरी साखर उताऱ्यानुसार २,४१२ रुपये एफआरपीचा दर बसला आहे. त्यातील केंद्र शासनाचे ४५ रुपये वगळता उर्वरित रक्कम कारखान्याने सभासदांना अदा केली आहे. त्याचबरोबर जूनमध्ये सभासदांना
कांडे बिलापोटी १०० रुपये अदा केले आहे, असे तावरे यांनी सांगितले. एकूण ५१२ रुपये दर यापूर्वी
देण्यात आला आहे. आता अंतिम दरापोटी २८८ रुपये सभासदांना देण्यात येणार आहे. चालू हंगामातील या अंतिम हप्त्यामुळे सभासदांना २८०० रुपये दर मिळणार आहे.
कारखान्याने या हंगामात ८ लाख ४१ हजार टन उसाचे गाळप केले. १० लाख ४ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. या कारखान्याला १ लाख २२ हजार साखर निर्यातीला परवानगी होती. त्यापैकी १ लाख ४ साखर पोती निर्यात केली आहेत.
२८०० रुपये अंतिम दर देणारा माळेगाव राज्यातील पहिलाच कारखाना आहे, असेही तावरे
यांनी सांगितले. कारखान्याने कामगारांना ३६ टक्के बोनस जाहीर केला आहे.
ऊस दर नियंत्रण मंडळांची परवानगी घेणार ऊस दर नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार एफआरपीचा दरच अंतिम समजला जातोे. मात्र, माळेगाव कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा २८८ रुपये सभासदांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा दरासाठी ऊस दर नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे. त्यांच्या परवानगीनंतर तातडीने घोषित दराची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे या वेळी तावरे यांनी सांगितले.