साडेदहानंतर कार्यालय गजबजले; जिल्हाधिकारी कार्यालय : रिॲलिटी चेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:29+5:302020-12-29T04:22:29+5:30
कोल्हापूर : ख्रिसमस, शनिवार आणि रविवार या सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता प्रत्येक विभागात ...
कोल्हापूर : ख्रिसमस, शनिवार आणि रविवार या सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता प्रत्येक विभागात एक, दोन कर्मचारी उपस्थित होते. सव्वादहाच्यादरम्यान बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांसह कर्मचाऱ्यांची वाहने कार्यालयाच्या आवारात येऊ लागली.
सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात किती कर्मचारी वेळेवर उपस्थित असतात, याचा ‘रिॲलिटी चेक’ ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहापर्यंतची आहे. यावेळेत सर्व विभागातील शिपाई हजर होते. काही कर्मचारीही येऊन चहा घेण्यासाठी गेले होते. तीन दिवसांच्या सुटीनंतर विभागांमध्ये आणि आवारातही साफसफाई सुरू होती. सव्वादहा वाजल्यापासून हळूहळू कर्मचारी येण्यास सुरुवात झाली. साडेदहा ते पावणेअकरा या वेळेत बहुतांशी कर्मचारी कार्यालयात आले. सायंकाळी पावणेसहापर्यंत कार्यालयाची वेळ असते; मात्र साडेसहापर्यंत कर्मचारी थांबलेले असतात. निवडणूक-महत्त्वाच्या बैठका असल्या किंवा महत्त्वाची कामे असतील, तर सुटीदिवशीही येऊन काम केले जाते.
--
विभागवार कर्मचाऱ्यांची उपस्थिती
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे : दहा वाजायला दहा मिनिटे कमी असतानाच कार्यालयात उपस्थित
जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक : जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांचे स्वीय सहायक वेळेत हजर
जमी, गावठाण, गृह, आस्थापना : ९ कर्मचारी, रोजगार हमी योजना १, संपादन २, महसूल ३, निवडणूक २, पुरवठा पाच, सामान्य शाखा ४, खणीकर्म, करमणूक १.
--
फोटो स्वतंत्र
---