कार्यालयांनी मास्क नाही - प्रवेश नाही फलक लावावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 06:03 PM2021-04-01T18:03:39+5:302021-04-01T18:06:34+5:30
CoronaVirus Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खासगी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, उद्योग, दुकाने बाजार या ठिकाणी मास्क नाही प्रवेश नाही हा फलक लावण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.
ठळक मुद्देकार्यालयांनी मास्क नाही - प्रवेश नाही फलक लावावा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व खासगी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, उद्योग, दुकाने बाजार या ठिकाणी मास्क नाही प्रवेश नाही हा फलक लावण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.
गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग वाढत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व कार्यालये, दुकाने व आस्थापनांमध्ये मास्क नाही प्रवेश नाही हा फलक लावणे व त्याचे पालन करणे बंधनकारक आहे.
प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे आढळल्यास अथवा फलक नसल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे ही आदेशात नमुद आहे.