खेलो इंडियाअंतर्गत प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:21+5:302020-12-30T04:34:21+5:30

प्रत्यक्ष उभारणीला गती मिळण्याची आशा (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : केंद्र शासनाच्या खेलो इंडियाअंतर्गत शहापूर येथे उभारण्यात येणाऱ्या ...

Officials inspect the site of the proposed sports complex under Play India | खेलो इंडियाअंतर्गत प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

खेलो इंडियाअंतर्गत प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next

प्रत्यक्ष उभारणीला गती मिळण्याची आशा

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : केंद्र शासनाच्या खेलो इंडियाअंतर्गत शहापूर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई)चे रिजनल सेंटरचे अधिकारी संजय मोरे यांनी मंगळवारी केली. त्यांच्यासोबत आमदार प्रकाश आवाडे होते. या पाहणीचा अहवाल केंद्रीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. त्यामुळे या क्रीडा संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला गती मिळणार असल्याची आशा निर्माण झाली आहे.

इचलकरंजी शहराची वस्त्रनगरीबरोबरच क्रीडापंढरी अशी ओळख आहे. शहर परिसरातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांत विशेष प्रावीण्य मिळविले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत शहापूर येथे गट क्र. ३८ येथे भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलासाठीचा सुमारे बारा कोटी ४३ लाख १७ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव इचलकरंजी नगरपरिषदेने शासनाकडे सन २०१६ साली पाठविला आहे. तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नांतून त्यावेळी राज्य शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.

त्याला तातडीने मान्यता मिळण्यासह निधी उपलब्ध होऊन क्रीडा संकुलाचे काम प्रत्यक्षात सुरू व्हावे म्हणून आमदार आवाडे प्रयत्नशील आहेत. शहापूरचा इचलकरंजी हद्दीत समावेश झाल्यानंतरच्या विकास आराखड्यात शहापूरातील एक लाख ८८ हजार स्क्वेअर फूट (सव्वाचार एकर) जागा क्रीडा संकुलासाठी आरक्षित करण्यात आली होती. त्याला आता गती मिळत आहे. खेलो इंडियाअंतर्गत याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार असून शहर व परिसरातील सर्वच क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी ती पर्वणी ठरणार आहे. अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली असून ते सविस्तर अहवाल देतील. त्यानंतर पुढील पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करून हे क्रीडा संकुल लवकरात लवकर उभारले जाईल, असेही आवाडे यांनी सांगितले.

या क्रीडा संकुलात २०० मीटर रनिंग ट्रॅक, अ‍ॅथोलेटिक स्टेडियम, कबड्डी, व्हॉलिबॉल, खो-खो मैदान, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, शूटिंग रेंज, रोल बॉल, लॉन टेनिस आदी सुविधा असणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक किसन शिंदे, भाऊसाहेब आवळे, उदयसिंह पाटील, रणजित जाधव, दादा भाटले, सचिन हेरवाडे, रावसाहेब पाटील, पांडुरंग सोलगे, अशोक पुजारी, नगरपरिषदेचे अभियंता संजय बागडे, अनिल सुतार, सचिन कांबळे, जितेंद्र साळुंखे, विजय पाटील, आदी उपस्थित होते.

(फोटो ओळी)

२९१२२०२०-आयसीएच-०५

२९१२२०२०-आयसीएच-०६

केंद्र शासनाच्या खेलो इंडियाअंतर्गत शहापूर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी अधिकारी संजय मोरे यांनी केली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, रणजित जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: Officials inspect the site of the proposed sports complex under Play India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.