‘आॅनलाईन’ निवडणूक प्रक्रियेने उमेदवार होणार ‘आॅफलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 12:09 AM2016-10-25T00:09:58+5:302016-10-25T01:14:45+5:30

उमेदवारांच्यात धास्ती : रोजचा खर्चसुद्धा आॅनलाईनच; उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरले जाण्यासाठी उमेदवारांच्या नेट कॅफेमध्ये चकरा

'Offline' will be the candidate for election campaign 'Offline' | ‘आॅनलाईन’ निवडणूक प्रक्रियेने उमेदवार होणार ‘आॅफलाईन’

‘आॅनलाईन’ निवडणूक प्रक्रियेने उमेदवार होणार ‘आॅफलाईन’

googlenewsNext

अनिल पाटील -- मुरगूड --नगरपालिका व नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन केली आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे; पण यासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला आता रोजच्या रोज इंटरनेटचा वापर करावा लागणार असल्याने या आॅनलाईन प्रक्रियेने प्रचाराच्या बाबतीत उमेदवाराला मात्र आॅफलाईन होण्याची धास्ती निर्माण झाली आहे. अगदी आवेदनपत्र भरण्यापासून चिन्ह निवडणे, माघार घेणे, शिवाय दररोजचा खर्चसुद्धा आॅनलाईनच सादर करावा लागणार असल्याने संगणकाची ओळख नसणाऱ्यांनी या प्रक्रियेची चांगलीच धास्ती घेतली आहे. सध्या तरी उमेदवार आपले आवेदनपत्र व्यवस्थित भरले जावे यासाठी निवडणूक प्रक्रिया कार्यालय व नेट कॅफेमध्ये चकरा मारताना दिसत आहेत.
डिजिटल इंडिया या घोषणेखाली केंद्र सरकार आणि राज्य सरकार अगदी तळाच्या घटकांपर्यत संगणकाचे ज्ञान घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी शालेय अभ्यासक्रमासह सर्वच क्षेत्रात संगणक शिक्षण अनिवार्य केले आहे. पेपरलेस काम व्हावे यासाठीच केंद्र आणि राज्य सरकार सर्वच निवडणूक प्रक्रिया आॅनलाईन करण्याच्या मन:स्थितीत होते. याची सुरुवात काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झाली. या प्रक्रियेत आवेदनपत्र आॅनलाईन भरण्याची सक्ती केली होती. अर्थातच हा पहिलाच प्रयत्न असल्याने काही गोष्टींना फाटाही देण्यात आला होता. त्यावेळच्या काही त्रुटी लक्षात घेऊन आता निवडणूक आयोग नव्या दमाने या पालिका निडणुकीमध्ये समोर येत आहे. त्यामुळे यावेळी मात्र सर्वच प्रक्रिया उमेदवाराला संगणकाच्या साहाय्याने आॅनलाईनच पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने चांगलीच खबरदारी घेतली असून अगदी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक प्रक्रियेतील कमर्चारी, सेतू कमर्चारी, महा ई सेवा केंद्र कर्मचारी, तसेच संगणक प्रशिक्षण संस्था यांच्या प्रशिक्षणाचा धडाकाच लावला आहे.
उमेदवारांना आॅनलाईन प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने ँ३३स्र२:// स्रंल्लूँं८ं३ी’ीू३्रङ्मल्ल. ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. अर्थातच २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंतच या संकेतस्थळावर २४ तास आवेदनपत्र भरता येणार आहे; पण राज्यातील नारपालिका व नगरपंचायतींची संख्या जास्त असल्याने सर्व्हर डाऊन ही समस्या येऊ शकते. त्यामुळे उमेदवाराने अगदी प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच सुरुवातीच्या काळात आवेदनपत्र सादर करावीत यासाठी या प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी ँ३३स्र://३ी२३२ीूॅस्र.ेंँंङ्मल्ल’्रल्लीॅङ्म५.्रल्ल/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले होते. यावर उमेदवारांना आपल्या आॅनलाईन आवेदपत्राची चाचणी घेता येत होती. अद्याप ही आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली असली तरी वरपासून खालच्या अधिकाऱ्यापर्यंत अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या असल्याने अगदी शेवटच्या काही दिवसांतच आवेदनपत्र सादर करण्याला गती येणार आहे.
आॅनलाईन आवेदनपत्र सादर करण्यासाठी सदरच्या संकेतस्थळावर प्रथम प्रत्येक उमेदवाराला नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी करत असताना उमेदवाराच्या नावाबरोबरच त्याचा ई-मेल आयडी व मोबाईल फोन नंबर देणे बंधनकारक आहे. याशिवाय याच ठिकाणी उमेदवाराला युजर नेम आणि पासवर्ड मिळणार असून, याद्वारेच त्याला आपल्या खात्यामध्ये निवडणूक प्रक्रियेची माहिती भरण्यासाठी जाता येणार आहे. वारंवार याचा वापर करावा लागणार असल्याने युजर नेम आणि पासवर्ड जतन करावे लागणार आहे. अर्थातच नोंदणीवेळी दिलेल्या फोन नंबरवर व ई-मेलवरही ते उमेदवाराला पाहावयास मिळणार आहे. याद्वारे उमेदवारांच्या खात्यामध्ये कोणालाही फेरफार करता येऊ शकत असल्याने याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. युजर नेम आणि पासवर्डद्वारे आपल्या खात्यात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवाराला सविस्तर माहिती भरावी लागणार आहे.
आॅनलाईन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी जुन्याच प्रक्रियेला पसंती दिली; पण निवडणूक आयोगाने युद्धपातळीवर आॅनलाईन निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने तो सर्वांना बंधनकारक असणार आहे. अर्थातच उमेदवार प्रचार सोडून या आॅनलाईन प्रक्रियेत अडकला तर तो निवडणुकीत आॅफलाईन होण्याची शक्यता निर्माण झाल्याने संगणक ज्ञानात तरबेज असणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यात हे इच्छुक उमेदवार गुंतलेले दिसत आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी आॅनलाईन निवडणूक प्रक्रियेमुळे कोणाचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरणार नाही असा विश्वास दिला असला तरीही सर्वच उमेदवारांनी याची धास्ती घेतली आहे हे नक्की.



तीन मुख्य विभागांमध्ये उमेदवाराला आपली माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये पूर्ण माहिती भरल्यानंतर त्या आवेदन पत्राची प्रिंट घेऊन ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. त्या ठिकाणीच अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.
अर्ज माघारीनंतर जे उमेदवार प्रत्यक्ष
निवडणूक लढविणार आहेत, त्या उमदेवारांची आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून उपलोड करावी लागणार आहेत.
याशिवाय कोणत्या उमेदवाराला कोणते चिन्ह पाहिजे हे आवेदनपत्र भरतानाच सांगावे लागणार आहे.
याशिवाय संपूर्ण कुटुंबाची माहिती, सांपत्तिक स्थिती, गाडी, दागिने, जमीन, घर याबाबत परिपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.

ााशिवाय उमेदवाराने दररोज केलेला खर्च ठरावीक वेळेत आॅनलाईन अपलोड करून त्याची प्रिंट घेऊन ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. अशा अनेक किचकट बाबींचा समावेश केला असल्याने उमेदवारांनी या प्रक्रियेची चांगलीच धास्ती घेतली आहे.

Web Title: 'Offline' will be the candidate for election campaign 'Offline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.