दुचाकीची वृध्दास धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:14+5:302021-03-16T04:24:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यल्लामा मंदिर ते हॉकी स्टेडियम रोडवर विश्वशांती पंचकर्मासमोर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने वृध्द पादचारी जखमी ...

The old man hit the bike | दुचाकीची वृध्दास धडक

दुचाकीची वृध्दास धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : यल्लामा मंदिर ते हॉकी स्टेडियम रोडवर विश्वशांती पंचकर्मासमोर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने वृध्द पादचारी जखमी झाले. शामराव पांडुरंग शिंदे (वय ७१, रा. रविवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. याबाबत त्याचा मुलगा शैलेश शिंदे यांनी अज्ञात वाहनांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भरधाव मोटारीच्या धडकेत तरुण जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर ते गगणबावडा मार्गावर काेपार्डे परिसरातील स.ब. खाडे कॉलेजनजीक अज्ञात भरधाव मोटारीने ठोकरल्याने रवींद्र आनंदा पाटील (वय १९, रा. आसगाव, ता. पन्हाळा) हा तरुण जखमी झाला. रवींद्र पाटील हा मित्रासह रस्त्याकडेला थांबला असताना ही दुर्घटना घडली. याप्रकरणी रवींद्रचे वडील आनंदा दिनकर पाटील (वय ४५, रा. आसगाव) यांनी करवीर पोलिसात अज्ञात मोटारचालकांवर तक्रार दिली.

दोन दुचाकींची चोरी

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी भाजी मंडई येथील साक्षी गणेश मंदिरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याबाबत विजय बापूसाहेब मोळे रा. महालक्ष्मीनगर, सुभाष रोड) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली. तसेच न्यू पॅलेसनजीक शाहुपुरी पोष्ट ऑफिससमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने बनावट चावीचा वापर करून चोरून नेली. याबाबत दुचाकीचालक दीपक महादेव कांबळे (वय ३१, रा. न्यू पॅलेस) याने दुचाकी चोरीची तक्रार शाहुपुरी पोलिसात दिली.

दारूसह मोपेड जप्त

कोल्हापूर: हॉकी स्टेडियमनजीक जुना राजवाडा पोलिसांनी बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई केली. रवींद्र मारुती सिध्दनाईक (वय ५०, रा. बालाजी पार्क), रवींद्र जयवंतराव माने (वय ४७, रा. खरी कॉर्नर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८७६० रुपये किमतीचे बिअर दारूचे बॉक्स व मोपेड असा सुमारे ५८ हजार ७६० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: The old man hit the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.