जुने पारगावला महापुराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:19+5:302021-07-27T04:25:19+5:30

नवे पारगाव : वारणेच्या महापुराने थैमान घातल्याने जुने पारगाव (ता. हातकणंगले) गावाला महापुराचा विळखा घट्ट झाला आहे. गावातील लोकांचे ...

Old Paragaon is flooded | जुने पारगावला महापुराचा विळखा

जुने पारगावला महापुराचा विळखा

Next

नवे पारगाव : वारणेच्या महापुराने थैमान घातल्याने जुने पारगाव (ता. हातकणंगले) गावाला महापुराचा विळखा घट्ट झाला आहे. गावातील लोकांचे बिरदेवनगर, पाराशरनगर, नवे पारगाव व नातेवाइकांच्या घरी स्थलांतर करण्यात आले आहे. जुने पारगावच्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. चाऱ्या विनाजनावरांचे हाल होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुने पारगावच्या पूरग्रस्त नागरिकांनी महापुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वेळीच स्थलांतर केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील, पाराशर विकासचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे, पोलीस पाटील इंद्रजित पाटील, सरपंच अरविंद पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी सिद, ग्रामविकास अधिकारी एम.आर. पाटील, तलाठी प्रधान भानसे व तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.

२६ पारगाव फ्लड

फोटो ओळी : जुने पारगाव (ता. हातकणंगले) गावाला महापुराचा विळखा. (छाया: दिलीप चरणे)

Web Title: Old Paragaon is flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.