‘म्हातारीचा पठार’ पर्यटकांना खुणावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:52 PM2018-12-02T23:52:51+5:302018-12-02T23:52:55+5:30

नामदेव पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क पांगिरे : मन प्रफुल्लित करणारे आल्हाददायक वातावरण, झुळझुळ वाहणारे वारे, रंगबेरंगी हंगामी रानफुले, ...

The 'old plateau' tourist is marking tourists | ‘म्हातारीचा पठार’ पर्यटकांना खुणावतोय

‘म्हातारीचा पठार’ पर्यटकांना खुणावतोय

googlenewsNext

नामदेव पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांगिरे : मन प्रफुल्लित करणारे आल्हाददायक वातावरण, झुळझुळ वाहणारे वारे, रंगबेरंगी हंगामी रानफुले, संथ तलाव, जांभा खडकात विस्तृत पसरलेला म्हातारीचे पठार
(कामट) पर्यटकांना आकर्षित करत असून पठारावर पर्यटकांची संख्या वाढत आहे.
भुदरगड तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली असून तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. गारगोटीपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेल्या इतिहासाचा साक्षीदार असणारा भुदरगड किल्ल्याला जोडून दक्षिणेस अथांग पसरलेला विस्तीर्ण असा उंच कडा आहे, त्याचे एक टोक आजरा तालुक्यातील हद्दीपर्यंत आहे. चारीबाजूस गर्द वनराई पसरलेली आहे. या परिसरात अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले असून हिंदी चित्रपटांनादेखील लाजवेल अशी लोकेशन आहेत. कड्यावरून फिरताना पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला येतो. पावसाळ्यात जोरदार पाऊस व धुके मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आंबोलीच्या थरार येथे अनुभवता येतो.
निसर्गाच्या कुशीत असणारे म्हातारीचे पठार (कामट) या नावाने देखील ओळखले जाते. पठारावरून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी बांध घालण्यात आला असून पाणी झुलपेवाडी धरणात वळवण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी पवनचक्कीचे काम सुरू होते. स्थानिक लोकांनी विरोध दर्शविल्यामुळे सध्या काम बंद आहे पवनचक्की उभा करण्यासाठी कच्चे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. वाहने थेट पठारावर घेऊन जाता येतात. त्यामुळे वाहनात बसून देखील पर्यटनाचा आनंद घेता येतो. अनेक शाळांनी या पठाराला भेटी दिल्या आहेत.
या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास भुदरगड तालुक्याच्या सौंदर्यात आणखीन भर पडेल. यासाठी पठारावर जाणारा पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, सनसेट पॉर्इंट विकास करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासनाने व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.

काय पाहाल
भुदरगड किल्ला, मंदिर, तलाव, इतिहासकालीन विहिरी, भारतीयसारख्या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झालेली जकीनपेठ, पेठ शिवापूर खेडी, लंबोत्री दगड, दगडात कोरलेली गुहा

Web Title: The 'old plateau' tourist is marking tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.