नाताळनिमित्त सजले कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:12 PM2018-12-24T17:12:53+5:302018-12-24T17:15:15+5:30
नाताळनिमित्त कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च सजले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला सायंकाळी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्या नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : नाताळनिमित्तकोल्हापूरातील सर्वात जुने चर्च सजले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला सायंकाळी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्या नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ताराबाई पार्क येथे असलेले हे ब्रिटिशकालीन आॅल सेंटस चर्च १८८१ मध्ये स्थापन करण्यात आले आहे. या चर्चचे आर्किटेक्चरही सर्वात जुने आहे. आतील भाग् घंटा आणि काचेवरील येशू ख्रिस्ताचे डिझाईन, वेदीवरील क्रॉस हा भाग सर्वात जुना आहे.
ब्रिटिश अधिकारी आणि सैन्यासाठी हा चर्च बांधण्यात आला. हा अँग्लिकन पध्दतीचा चर्च असून अशाप्रकारचे केवळ दोनच चर्च कोल्हापूरात आहेत. दुसरे चर्च ब्रम्हपुरी परिसरात आहे. ताराबाई पार्क येथील चर्चमध्ये इंग्लिश पध्दतीची प्रार्थना होते तर ब्रम्हपुरी परिसरातील चर्चमध्ये मराठीमध्ये प्रार्थना होते.
मुंबईचे बिशप रेव्हरंड एच. ए. डग्लस यांच्या स्मरणार्थ हे चर्च १८८१ मध्ये बांधण्यात आले. नाताळनिमित्त या दोन्ही चर्चमध्ये तयारी सुरु असून ताराबाई पार्क येथील चर्चमध्ये रेव्हरंड शशिकांत गोगटे हे पालक आहेत. आज ख्रिसमस ईव्ह आणि उद्या ख्रिसमस सर्व्हिससाठी याठिकाणी विविध कार्यक्रम, प्रार्थना होणार आहे.