ओंकारची जिनिअर वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:28+5:302021-08-17T04:30:28+5:30

कबनूर रस्त्यावरील लक्ष्मी मंदिरात आयोजित या उपक्रमास रूईसह पंचक्रोशीतील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन ओंकारच्या उपक्रमाचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन ...

Omkar's entry in the Junior World Record | ओंकारची जिनिअर वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

ओंकारची जिनिअर वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Next

कबनूर रस्त्यावरील लक्ष्मी मंदिरात आयोजित या उपक्रमास रूईसह पंचक्रोशीतील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन ओंकारच्या उपक्रमाचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिले.

सलग पाच तास लाठी फिरविण्याची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. तो विक्रम मोडून आठ तासांचा विक्रम करण्याची ओंकार हुपरे याची जिद्द होती. त्याप्रमाणे त्याने विक्रम केला असून याची आशियन बुक रेकॉर्ड, लिम्का बुक रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिनिअस वर्ल्ड रेकॉर्ड लिमिटेड या संस्थेने ओंकार हुपरे याच्या विक्रमाची तत्काळ नोंद घेऊन त्याला सर्टिफिकेट बहाल केले आहे.

ओंकार हुपरे याने अथक परिश्रम घेऊन विक्रमाची तयारी केली होती. विश्व हिंदू परिषद शाखेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. आमदार राजू आवळे, माजी आमदार राजीव आवळे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, सौरभ शेट्टी, आदींनी ओंकारची भेट घेऊन त्याचे कौतुक केले तसेच त्याला मदतीची तयारी दर्शविली. उपक्रमाच्या सांगता सोहळ्यास माजी आमदार व ‘गोकुळ’चे संचालक डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक भाऊसाहेब फास्के यांनी केले. कोल्हापुरी फेटा बांधून ओंकारचा सत्कार केल्यानंतर डॉ. मिणचेकर म्हणाले, रूईसारख्या ग्रामीण भागातील खेळाडूची विश्वविक्रम करण्याची जिद्द कौतुकास्पद आणि भूषणावह आहे. यानिमित्ताने रुई गावाचाही जगभरात लौकिक होईल. राहुल आवाडे म्हणाले, ओंकारच्या आजवरच्या वाटचालीस आम्ही मदत केली आहे. भविष्यातही लागेल ती आर्थिक व इतर मदत निश्चितपणे केली जाईल.

फोटो ओळी

१६०८२०२१-आयसीएच-०३

रुई (ता.हातकणंगले) येथे ओंकार हुपरे याचा माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सत्कार केला. यावेळी जयसिंग शिंदे, दत्ता पाटील, भाऊसाहेब फास्के, संजय चौगुले, अविनाश शिंदे, प्रा. राजाराम झपाटे उपस्थित होते.

Web Title: Omkar's entry in the Junior World Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.