'केवळ ७५ रूपये' तिकीटामध्ये 'मल्टिप्लेक्स'ला बघा चित्रपट, कोल्हापुरात सकाळपासूनच तरूणाईची गर्दी
By समीर देशपांडे | Published: September 23, 2022 12:55 PM2022-09-23T12:55:15+5:302022-09-23T12:55:53+5:30
गेल्या चार दिवसांपासूनच तरूणाईने बुकिंग करण्यास सुरूवात केली होती.
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय चित्रपट दिनाच्यानिमित्ताने ७५ रूपयांमध्ये मल्टिप्लेक्सचे तिकीट उपलब्ध झाल्यामुळे आज, शुक्रवारी देशभर सर्वत्र तरूणाईने चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केल्याचे चित्र आहे. कोल्हापुरातही सकाळपासूनच तरुणाईंनी अशीच मोठी गर्दी केली आहे.
२३ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय चित्रपट दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने एरवी असणारी १५० ते १८० रूपयांची चित्रपटाची तिकिटे ७५ रूपयांमध्ये जाहीर केली होती. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासूनच तरूणाईने बुकिंग करण्यास सुरूवात केली होती.
काही ठिकाणी सकाळी सव्वा सहापासूनच शो चे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सर्वच शो ना तरूणाईची पसंती असून दिवसभरात आणि रात्री उशिराच्या शो नाही मोठे बुकिंग झाले आहे. सवलतीच्या दरातील या तिकिटामध्ये ‘ब्रम्हास्त्र’ पाहण्यासाठीची संधी तरूणाईने साधली आहे.