एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत नाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:58 AM2019-04-08T00:58:44+5:302019-04-08T00:58:50+5:30

कोल्हापूर-कुरुंदवाड व्हाया इचलकरंजी 46 कि.मी. संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत ...

Once polling is done, no one is worried ... | एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत नाय...

एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत नाय...

Next

कोल्हापूर-कुरुंदवाड व्हाया इचलकरंजी
46 कि.मी.
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत नाय. हे थांबायला पाहिजे. शेतकऱ्यांना दाम अन् पोरांच्या हाताला काम मिळावं. मोदींना संधी देऊन बघितली, आता नवीन लोकांचा इचार कराय हरकत नाही,’ अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने हातकणंगले मतदारसंघात एस. टी.ने प्रवास करीत कबनूर, इचलकरंजी, अब्दुललाट, शिरोळ, कुरुंदवाड, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी परिसरातील मतदारांच्या भावना जाणून घेतल्या. सेवानिवृत्त दाम्पत्य सुभाष व वीणा मुणगेकर यांनी पेन्शन किमान तीन हजार रुपये व्हावी. इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसायाकरिता भरीव योजना राबवावी, अशा अपेक्षा व्यक्त केली. अब्दुललाटचे अशोकराव मोरे म्हणाले, ‘चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्या मोदींनी खºया चौकीदारांचे दुखणे दूर करावे. शिरोलीचे महावीर बनसोडे म्हणाले, खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या विरोधातील उमेदवार धैर्यशील माने हे शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्नांच्या सोडवणुकीचे मुद्दे घेऊन प्रचार करीत आहेत. निवडणुकीनंतर आश्वासनांची पूर्तता करावी. अब्दुललाटच्या महादेवी पाटील म्हणाल्या, सरकारनं शेतकऱ्यांच्या पिकाला दाम अन् पोरांच्या हाताला काम द्यावं. रावसाहेब पुजारी म्हणाले, सरकारने महागाई आटोक्यात आणावी. परतीच्या प्रवासात शेडशाळची नवमतदार ऋतुजा तकडे म्हणाली, नव्या सरकारने शेती, शिक्षण, रोजगार उपलब्धतेला प्राधान्य द्यावे.

तुकाराम देसाई म्हणाले, भाजप सरकारने शेतकºयांच्या सुविधा कमी केल्या. कर्जमाफी सरसकट हवी होती.
नितीन तेली यांनी नोटाबंदी, जीएसटीमुळे काळा पैसा तर बाहेर आलाच नाही; उलट रोजगार घटल्याबाबतची नाराजी व्यक्त केली.
चांदणी पाटील म्हणाल्या, राजकीय पक्षांनी शेतकरी, सर्वसामान्यांचा विचार करावा.

Web Title: Once polling is done, no one is worried ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.