पुरग्रस्त जनावरांना दिला एकरातील ऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:40 PM2019-08-12T17:40:51+5:302019-08-12T17:44:47+5:30

कोल्हापूर जिल्हात पुराने हाहाकार माजला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने बजरंग कोंडीबा पाटील  यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एकर उभे ऊस पीक कापून चारा पुरविला आहे. हा ऊस रुई,चंदुर,पारगाव येथे पाठविण्यात आला आहे. 

One acre of sugarcane was given to the affected animals | पुरग्रस्त जनावरांना दिला एकरातील ऊस 

पेठवडगाव येथील  बजरंग कोंडीबा पाटील  यांनी स्वतःच्या शेतातील एकर उभे ऊस पीक कापून चारा पुरविला .सोबत ऊस तोडणी व ट्रॅक्टर ची मदत नागरिकांनी केली .(छाया : क्षितिज जाधव वडगाव)

Next
ठळक मुद्देपुरग्रस्त जनावरांना दिला एकरातील ऊस पेठवडगाव येथील बजरंग पाटील शेतकर्याची मदत

सुहास जाधव

पेठवडगाव : कोल्हापूर जिल्हात पुराने हाहाकार माजला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने बजरंग कोंडीबा पाटील  यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एकर उभे ऊस पीक कापून चारा पुरविला आहे. हा ऊस रुई,चंदुर,पारगाव येथे पाठविण्यात आला आहे. 
 

महापुराचे पाणी वाढेल तसे नागरिकांना काहीही सुचत नव्हते. तर आपल्या मुला हून अधिक लळा लावलेले पशूधन वाचविण्यासाठी ही प्रयत्न केले.मात्र पावसामुळे जनावरांचा चार्या अभावी धोक्यात येत होती.मदत आम्हाला नको, पण जनावरांना चारा आणा असे सांकडे घालण्यात येत होते.

ही संवेदनशीलता जपत पाटील यांनी शेतातील उभा एक एकर ऊस देण्याचा निर्णय घेतला. हा ऊस तोडणीसाठी विजयसिंह शिंदे, धनाजी केर्लेकर, दि ग्रेट मराठा स्पोर्टस, केदारलिंग तरुण मंडळ ,सोनार्ली वसाहत , तांबवे वसाहत मधील कार्यकर्त्यांनी मदत केली. तसेच वाहतुकीसाठी श्रीरंग पाटील (तांबवे वसाहत) , लक्ष्मण पाटील( सोनार्ली वसाहत) यांनी ट्रॅक्टर दिला. 

Web Title: One acre of sugarcane was given to the affected animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.