‘महसूल’चे दीड हजार अधिकारी-कर्मचारी निवडणुकीत, कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:50 PM2019-03-12T12:50:00+5:302019-03-12T12:52:13+5:30
लोकसभा निवडणुकीच्या कामात महसूल विभागातील सुमारे दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंतचे सर्व अधिकारी व कर्मचारी या कामात असल्याने अत्यावश्यक असलेल्या पुरवठा विभागाच्या कामासह दाखले, सातबारे, शस्त्र परवाने, जमीनविषयक कामांवर परिणाम झाला आहे. जवळपास तीन महिने येथील कामकाज ठप्प राहण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कामात महसूल विभागातील सुमारे दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंतचे सर्व अधिकारी व कर्मचारी या कामात असल्याने अत्यावश्यक असलेल्या पुरवठा विभागाच्या कामासह दाखले, सातबारे, शस्त्र परवाने, जमीनविषयक कामांवर परिणाम झाला आहे. जवळपास तीन महिने येथील कामकाज ठप्प राहण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असल्याने महसूलसह सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी करावी लागते. महसूल विभागातील जवळपास शंभर टक्के अधिकारी व कर्मचारी हे या कामात आहेत.
निवडणूक कामात महसूल विभाग हा महत्वाचा भाग असल्याने सर्व प्रमुख जबाबदाºया या विभागावरच असतात. त्यामुळे जवळपास सर्वच स्टाफ हा निवडणुकीच्या कामासाठी सक्रिय ठेवला जातो. निवडणुकीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने ‘महसूल’मधील इतर कामांकडे पाहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ नाही.
त्यामुळे पुरवठा विभागातील दैनंदिन कामांसह महसूलमधील दाखले, सातबारे, जमीनविषयक परवाने यांची कामे ठप्प झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रांताधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालये, तलाठी कार्यालयांमध्ये इथून पुढे जवळपास तीन महिने असेच चित्र राहणार असल्याचे चित्र आहे.
निवडणूक कामातील अधिकारी व कर्मचारी
- उपजिल्हाधिकारी - १२
- तहसीलदार - २१
- नायब तहसीलदार - ४०
- लेखाधिकारी - २
- सहा.लेखाधिकारी - २
- लघुलेखक (निन्मश्रेणी) - ५
- उपलेखापाल - ३
- मंडल अधिकारी - ७२
- अव्वल कारकून - १८२
- लिपिक - २४५
- वाहनचालक - २२
- तलाठी - ४००
- शिपाई - १२४
- कोतवाल - ४००