मुलींसाठी एक कोटीच्या सायकली

By Admin | Published: August 29, 2014 12:28 AM2014-08-29T00:28:54+5:302014-08-29T00:32:20+5:30

जिल्हा परिषदेची योजना : निविदा मागविल्या

One crore bicycles for girls | मुलींसाठी एक कोटीच्या सायकली

मुलींसाठी एक कोटीच्या सायकली

googlenewsNext


उस्मानाबाद/ढोकी : शेतकऱ्यांची लक्ष्मी आणि कामधेनु असलेला तेरणा सहकारी साखर कारखाना चुकीच्या माणसांच्या हातात दिला. ‘त्या’ माणसांनी कारखाना चालविण्याऐवजी भंगारात काढला. त्यामुळे आज शेतकऱ्यांसोतबच कामगारही देशोधडीला लागले असून मामा-भाच्याने मिळून शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम केल्याची तोफ माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंंह पाटील यांनी डागली.
तेरणा कारखान्यातील गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी, कारखान्यावर प्रशासक नेमावा, तहसीलदारांनी २०१० पासूनचे कारखान्याचे रेकॉर्ड जप्त करावे, शेतकऱ्यांचे उसाचे बिल देण्यात यावे, कामगारांचे वेतन तातडीने द्यावे यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला ढोकी गावातील श्रीराम मंदिरापासून प्रारंभ झाला. यामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी, सभासद, कामगार आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मोर्चा कारखानास्थळी आल्यानंतर त्यांनी जनसमुदायास संबोधित केले. यावेळी बाळासाहेब पाटील, रशीद काझी, आबा दंडनाईक, नगर परिषद गटनेते नंदू राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, सतीश दंडनाईक, रामचंद्र पाटील, ढोकीचे माजी उपसरपंच शिवाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, १९७८ मध्ये तेरणा सहकारी साखर कारखाना डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या ताब्यात आला. सुरूवातील या कारखान्याची साडेबाराशे मेट्रीक टन इतकीच गाळप क्षमता होती. मात्र, उसाचे क्षेत्र वाढत गेल्याने गाळप क्षमता १ हजार ८०० मेट्रीक टनापर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतरही ऊस वाढच गेला. त्यामुळे गाळप क्षमता २ हजार २०० मेट्रीक टन इतकी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा साडेतीन हजार मेट्रीक टनापर्यंत गाळप क्षमता नेण्यात आली. त्यानंतही गाळपासाठी येणाऱ्या उसाचे प्रमाण वाढतच गेले. ही बाब लक्षात घेवून डॉ. पद्मसिंह पाटील यांनी कारखान्याची गाळप क्षमता पाच हजार मेट्रीक टनापर्यंत नेली. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, हा यामागचा डॉ. पद्मसिंहांचा प्रमुख उद्देश होता, असे ते म्हणाले. २००७ मध्ये कारखान्यात ८ लाख ३६ हजार मेट्रीक टन इतके विक्रमी गाळप झाले. असे असतानाच कारखान्यात सत्तांतर झाले. डॉ. पद्मसिंंह पाटील यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच विश्वासघात केला. त्याची शिक्षा मला आणि डॉक्टरांनाही दिली. परंतु, यामध्ये सर्वांचेच नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले. ज्या ठिकाणी ऊस उभा होता, त्या ठिकाणी आज काँग्रेस गवत उगवले आहे. आमदारांनी किमान या शेतामध्ये उसाची लागवड केली असती तर कामगारांच्या पगारी झाल्या असत्या, असा टोलाही पाटील यांनी लगावला. २००७ साली कारखाना सोडला, तेव्हा सुमारे साडेतीनशे कोटीचा माल होता. तो गेला कोठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी गफार काझी, रामभाऊ देशमुख, कोंडप्पा कोरे, दिलीप नाडे, तानाजी पवार, तानाजी जमाले, सुरेश देशमुख, प्रवीण यादव आदींची भाषणे झाली. त्यांनीही कारखान्याच्या कारभारावर टिकेची झोड उठविली. (प्रतिनिधी)
कारखान्यातील भंगार विक्री करण्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु, तशी कुठल्याही स्वरूपाची परवानगी न घेताच भंगार विक्री करण्यात आले. त्यामुळे याला भंगार चोरी म्हणायचे नाही, तर आणखी काय? असा सवाल करीत उत्पादित मालाचे साडेतीनशे कोटी आणि गाळपाचे ६०० कोटी असे एकूण साडेनऊशे कोटी रूपये गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला. आमदारांना याचा जाब द्यावाच लागेल, असेही राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले.
तेरणा साखर कारखान्याचे २२ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. आजघडीला केवळ नऊ संचालक राहिले आहेत. उर्वरित संचालकांनी राजीनामे का दिले? असा सवाल करीत कारखान्याचा कारभार पाहणारी मंडळी सोंगाडी असल्याचा आरोप त्यांनी केला. यांच्या कारभाराला कंटाळल्याचे सांगत मामा-भाच्याने मिळून कारखाना देशोधडीला लावून शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घरावर एकप्रकारे नांगर फिरविण्याचे काम केल्याचे ते म्हणाले.

Web Title: One crore bicycles for girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.