वाढीव पाईपलाईनसाठी एक कोटीचा निधी मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:53+5:302021-07-20T04:18:53+5:30

कबनूर : कोरोना उपयोजनांतर्गत येथील कोविड केंद्राला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व बायो पॅकची सुविधा मिळावी. तसेच गावांतर्गत गटारी, दिवाबत्ती व ...

One crore should be provided for the extension pipeline | वाढीव पाईपलाईनसाठी एक कोटीचा निधी मिळावा

वाढीव पाईपलाईनसाठी एक कोटीचा निधी मिळावा

Next

कबनूर : कोरोना उपयोजनांतर्गत येथील कोविड केंद्राला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व बायो पॅकची सुविधा मिळावी. तसेच गावांतर्गत गटारी, दिवाबत्ती व वाढीव पाईपलाईनसाठी फंडातून एक कोटी निधी गावासाठी उपलब्ध करून मिळावा, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सहिफ मुजावर यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

निवेदनात, कबनूर गावची लोकसंख्या साठ हजारांवर आहे. वाढते शहरीकरण व औद्योगिकरणामुळे ग्रामपंचायतीस नागरी सुविधा पुरवणे अशक्य होत आहे. ग्रामपंचायत व मेडिकल असोसिएशन यांच्या विद्यमाने गावात तीस बेडचे कोविड केअर केंद्र सुरू केले आहे. आजपर्यंत ३४ रुग्ण केंद्रामधून मोफत उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व बायो पॅक उपलब्ध करून द्यावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगवले, गनीभाई मुल्ला, सतीश चव्हाण, बबन इंगळे, राहुल कांबळे, दस्तगीर मुजावर, जावेद मुजावर, अक्षय कांबळे, बाबाजान अपराज आदी होते.

फोटो ओळी

१९०७२०२१-आयसीएच-०७

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सहिफ मुजावर यांनी निवेदन दिले. यावेळी सुनील इंगवले, जावेद मुजावर, गनीभाई मुल्ला उपस्थित होते.

Web Title: One crore should be provided for the extension pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.