पहिल्या फेरीतील ‘अकरावी’ प्रवेशासाठी उरला एक दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:27 AM2021-09-14T04:27:56+5:302021-09-14T04:27:56+5:30
कोल्हापूर : शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतून इयत्ता अकरावीसाठी सोमवारपर्यंत एकूण ३०७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. पहिल्या फेरीतून ...
कोल्हापूर : शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतून इयत्ता अकरावीसाठी सोमवारपर्यंत एकूण ३०७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. पहिल्या फेरीतून प्रवेश निश्चितीसाठी बुधवार (दि. १५) पर्यंत मुदत आहे. त्यादिवशी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने दि. ७ सप्टेंबरला पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली. त्यामध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ३०७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून, त्यात विज्ञान विद्याशाखेचे सर्वाधिक १६१७ विद्यार्थी आहेत. पहिल्या फेरीत प्रवेशाची अंतिम मुदत बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. निवड यादी तयार करताना ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेत बाद झाले, काही कारणांमुळे अथवा तांत्रिक अडचणीमुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत अर्ज करता आला नाही, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्याचे वेळापत्रक केंद्रीय समितीकडून जाहीर केले जाणार असल्याचे सचिव सुभाष चौगुले यांनी सोमवारी सांगितले.
सोमवारी प्रवेश निश्चित केलेेले विद्यार्थी
विज्ञान : ३०६
वाणिज्य (मराठी) : १४७
वाणिज्य (इंग्रजी) : १८४
कला (मराठी) : १५१
कला (इंग्रजी) : ८