चोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील इस्पुर्ली येथे घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 01:30 PM2023-02-24T13:30:56+5:302023-02-24T13:55:47+5:30

लोखंडी पाईपने केली होती मारहाण

One died after being beaten up by a thief, The incident took place at Ispurli in Kolhapur | चोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील इस्पुर्ली येथे घडला प्रकार

चोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील इस्पुर्ली येथे घडला प्रकार

googlenewsNext

चुये : इस्पुर्ली (ता. करवीर) येथे चोरी करण्यासाठी चोर आल्याच्या संशयावरून दुकान मालकाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नानासो आनंदा चौगले (वय ४७, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील दिंगबर तुकाराम मगदूम (वय ३३ ) यांचे इस्पुर्ली येथे गारगोटी मार्गावरती फॅब्रिकेटर्सचे दुकान आहे. या दुकानाच्या आवारात उघड्यावर लोखंडी पाईप व इतर साहित्य ठेवलेले आहे. मंगळवारी (दि.२२) रात्री नऊच्या सुमारास नानासो हे दुकानाच्या आवारात गेले असता, चोरीसाठी आल्याच्या संशयावरून दिगंबर यांनी लोखंडी पाईपने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. ही घटना चौगले यांच्या नातेवाइकांना समजल्यानंतर त्यांनी नानासो यांना उपचारांसाठी सीपीआर येथे दाखल केले होते. बुधवारी (दि.२३) सकाळी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 

मृताचे नातेवाईक संदीप विलास चौगले यांनी माऊली फॅब्रिकेटर्सचे मालक दिगंबर मगदूम यांनी केलेल्या मारहाणीत नानासो यांचा मुत्यू झाल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात दिली आहे. रात्री उशिरा दिगंबर मगदूम याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी व सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी भेट दिली. मृत नानासो चौगले हे शेती करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई्- वडील व दोन मुले असा परिवार आहे. अधिक तपास इस्पुर्लीचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील करीत आहेत.

Web Title: One died after being beaten up by a thief, The incident took place at Ispurli in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.