Kolhapur: नाष्टा करताना ठसका अन् उलटी आल्याने अन्ननलिकेला इजा, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:24 PM2024-11-11T16:24:31+5:302024-11-11T16:25:29+5:30

कोल्हापूर : इस्लामपूर येथील औद्योगिक वसाहतीत कंपनीबाहेर हॉटेलमध्ये नाष्टा करताना ठसका आला आणि त्याचवेळी उलटी आल्याने अन्ननलिकेला इजा होऊन ...

One died of esophageal injury due to suffocation and simultaneous vomiting | Kolhapur: नाष्टा करताना ठसका अन् उलटी आल्याने अन्ननलिकेला इजा, एकाचा मृत्यू

Kolhapur: नाष्टा करताना ठसका अन् उलटी आल्याने अन्ननलिकेला इजा, एकाचा मृत्यू

कोल्हापूर : इस्लामपूर येथील औद्योगिक वसाहतीत कंपनीबाहेर हॉटेलमध्ये नाष्टा करताना ठसका आला आणि त्याचवेळी उलटी आल्याने अन्ननलिकेला इजा होऊन एकाचा मृत्यू झाला. तानाजी बळीराम कदम (वय ५७, रा. मसुचीवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान शनिवारी (दि. ९) रात्री त्यांचा मृत्यू झाला.

मसुचीवाडी येथील तानाजी कदम हे इस्लामपूर औद्योगिक वसाहतीमधील राजाराम सॉल्व्हेक्स येथे काम करीत होते. २५ ऑक्टोबरला दुपारी ते कंपनीबाहेरच्या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. नाष्टा करताना त्यांना ठसका लागला. त्याचवेळी उलटी आली. ते अत्यवस्थ होताच इतर सहका-यांनी त्यांना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ठसका आणि उलटी या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने त्यांच्या अन्ननलिकेवर ताण पडला. अन्ननलिका फुटून उलटी पोटातील इतर अवयवांकडे पसरली. 

इस्लामपुरातील डॉक्टरांनी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाइकांनी कदम यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अन्ननलिकेला झालेली इजा आणि पोटात पसरलेल्या उलटीने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. बुधवारी (दि. ६) त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: One died of esophageal injury due to suffocation and simultaneous vomiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.