पट्टणकोडोलीत विजेच्या धक्क्याने एकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:09+5:302021-08-19T04:28:09+5:30
दरम्यान, येथील प्राथमिक केंद्रात महावितरणचे काळे यांना सांगूनही वेळेत न आल्याने मृताचे नातेवाईक व ग्रामस्थ यांच्यातून प्रचंड रोष निर्माण ...
दरम्यान, येथील प्राथमिक केंद्रात महावितरणचे काळे यांना सांगूनही वेळेत न आल्याने मृताचे नातेवाईक व ग्रामस्थ यांच्यातून प्रचंड रोष निर्माण झाला होता. यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी आडके आणि अवधूत कीर्तिकर यांनी महावितरणचे काळे यांना चांगलेच धारेवर धरत खडे बोल सुनावले. यावेळी काळे यांनी भीतीपोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून पळ काढला.
पट्टणकोडोली येथील आरजी मळा येथील शकील ईलाई मुल्लाणी यांच्या गट नंबर ९८७ मधील उसाच्या शेतामध्ये औषध फवारणीचे काम सुरू होते. हे काम आण्णासो दादू रांगोळे आणी मौला नबी महात यांच्यासहित पाचजण करीत होते. याच शेतामध्ये विजेची तार तुटून पडली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास यातील आण्णासो रांगोळे यांचा या तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोराचा धक्का बसल्याने ते जागीच मृत्युमुखी पडले; तर मौला महात यांनाही विजेचा धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी बाकीच्या तिघांनी हा प्रकार पाहून महावितरण कंपनीला कळविले व वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी आण्णासो रांगोळे हे मृत झाल्याचे घोषित केले तर मौला महात यांना कोल्हापूर येथील पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. हुपरी पोलिसांत या घटनेची वर्दी संजय बाळासो रांगोळे यांनी दिली आहे.
चौकट
आण्णासो रांगोळे व मौला महात यांना विजेच्या तारेचा स्पर्श होऊन धक्का बसल्याने रांगोळे हे जागीच मृत्युमुखी पडले; तर महात हे गंभीर जखमी झाले. यावेळी जखमी यांनी आपल्या तीन साथीदारांना विजेचा धक्का बसल्याचे खुणावल्याने बाकी तीन साथीदार हे जवळ गेले नाहीत. त्यामुळे हे तिघे या दुर्घटनेतून बचावले.
-------------------
फोटो : अण्णासो रांगोळे