हेरले येथे स्वाईन फ्लू सदृश्य साथीने एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:58 PM2019-08-09T15:58:58+5:302019-08-09T15:59:42+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले.
हेरले/कोल्हापूर : हेरले (ता हातकणंगले) येथे राजू आण्णासो खोचगे (वय ५० ) यांचा खाजगी रुग्णालयात स्वाईन फ्लू सदृश्य साठीने मृत्यू झाला. ५ ते ६ दिवसांपूर्वी राजू खोचगे यांना ताप आला होता. त्यांना उपचारासाठी गावांत खाजगी दवाखान्यात दाखविले मात्र त्यांचा ताप कमी येईना म्हणून चार दिवसा पूर्वी मिरज मधील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये निमोनिया व स्वाईन फ्ल्यू सदृश्य लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांकडून मिळाली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्यांच्या पत्नीस, मुलगा, मुलगीस प्रतिबंधक ओषधोपचार केला आहे. तसेच ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये, पाणी उकळून गाळून प्यावे, खोकला सर्दी झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घ्यावेत असे आवाहन केले आहे.