‘गोळीबार’ची एक इंचही जमीन धनदांडग्यांना मिळू देणार नाही

By admin | Published: October 24, 2015 01:13 AM2015-10-24T01:13:38+5:302015-10-24T01:19:44+5:30

एकनाथ खडसे यांचा इशारा : काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करण्याचे आवाहन

One inch of the firing will not allow the rich to get the land | ‘गोळीबार’ची एक इंचही जमीन धनदांडग्यांना मिळू देणार नाही

‘गोळीबार’ची एक इंचही जमीन धनदांडग्यांना मिळू देणार नाही

Next

कोल्हापूर : पोलिसांच्या सरावासाठी असलेल्या गोळीबार मैदानावर कोणीतरी धनदांडगे नजर ठेवून हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु यातील एक इंचही जमीन त्यांना घेऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे दिला.कसबा बावडा येथील गवत मंडई येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव धोंडी पाटील होते.
खडसे म्हणाले, कोल्हापूरकरांवर टोल लादणारेच आता टोलमाफीची मागणी करत आहेत; परंतु हा टोल आणला कुणी? आयआरबीला परवानगी दिली कुणी? त्यासाठी ठराव कुणी केला? राज्यात सत्ता असताना तो का घालविला नाही ?अशी विचारणाही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केली. हा टोल भाजपच घालविणार आहे. त्यासाठी सरकारच पैसे देईल, बंटी पाटील, पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार त्यासाठी पैसे देणार नाहीत.
कसबा बावड्यातील माजी गृहराज्यमंत्र्यांच्या झुंडशाहीला सुरूंग लावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. केंद्राच्या योजना शहरात आणण्यासाठी भाजपला सत्ता दिल्यास शहराचा कायापालट करू, असे ते म्हणाले.

‘हसनमियाँ’नी उमेदवारांची डिपॉझिट वाचवून दाखवावी
‘हसनमियाँ’ जनतेला मूर्ख बनवायचे काम करत आहेत. एकाबरोबर ‘पैरा’ फेडण्याची भाषा करत ते महाडिकांच्या वळचणीलाही जाऊन बसतात. त्यांनी कसबा बावडा व कदमवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझिट वाचवून दाखवावी, असे आव्हान माजी महापौर सुनील कदम यांनी दिले. हसन मुश्रीफ यांच्यावर कदम यांनी चांगलेच तोंडसुख घेत ते प्रत्येकाबरोबर सेटलमेंट करतात, असा आरोपही केला.


रमणमळा तलावाची जागा बंटी, मुश्रीफ यांनी घशात घातली
रमणमळ्यातील तलावाची शासकीय जागा माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांनी घशात घातली आहे. त्यातील १५ हजार स्क्वेअर फूट जागाही हसन मुश्रीफ यांनी लाटली आहे. त्या जागेवरील सात बारावर मुश्रीफ यांच्या मुलाचे नाव आहे. हे सर्व सात बारे आपण काढले असून ते चौकशीसाठी मंत्री खडसे यांना देणार आहे, असा घणाघाती आरोप सुनील कदम यांनी केला. गोळीबार मैदानावरील पोलिसांचा सराव का थांबला? हे मैदान कोणी घशात घातले? अशी विचारणा करत जागा हडपणाऱ्यांना हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.

उरल्या सुरल्या शिवसेनेलाही हद्दपार करा
देशातून राज्यातून जसे काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार केले तसे महापालिकेतूनही येथील जनतेनेही त्यांना हद्दपार करावे, असे आवाहन करत उरल्या सुरलेल्या शिवसेनेलाही हद्दपार करावे, असा टोलाही मंत्री खडसे यांनी लगावला.

Web Title: One inch of the firing will not allow the rich to get the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.