जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ४८ शिक्षकांना एक वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:38+5:302021-06-25T04:17:38+5:30

या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दि.१२ डिसेंबर २०००च्या शासन निर्णयाद्वारे एक आगाऊ वेतनवाढ दिली जात होती. परंतु सहाव्या ...

One increment for 48 teachers who received District Adarsh Shikshak Puraskar | जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ४८ शिक्षकांना एक वेतनवाढ

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ४८ शिक्षकांना एक वेतनवाढ

googlenewsNext

या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दि.१२ डिसेंबर २०००च्या शासन निर्णयाद्वारे एक आगाऊ वेतनवाढ दिली जात होती. परंतु सहाव्या वेतन आयोगातील शिफारसीचा चुकीचा अर्थ लावून घेऊन जिल्हा प्रशासनाने सन २००६ नंतरच्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ देण्याच्या लाभापासून वंचित ठेवले होते. या विरोधात पुरस्कारप्राप्त शिक्षक सुनील कारंजकर आणि इतर ४८ जणांनी ॲड. सुरेश पाकळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि सी. व्ही. भडंग यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने गुरुवारी या शिक्षकांना मागील फरकासह एक आगाऊ वेतनवाढ चार महिन्यांत देण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हा परिषदेला दिले. त्यामुळे याचिकाकर्त्या ४८ शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ, फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती भरत रसाळे यांनी दिली.

Web Title: One increment for 48 teachers who received District Adarsh Shikshak Puraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.