ट्रॅक्टरला धडकून बोरवडेचा एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:12+5:302021-02-06T04:44:12+5:30

बोरवडे येथील संभाजी साठे हे आपल्या मोटारसायकलीवरून शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास मुदाळ तिट्ट्याकडील शेताकडे ऊसतोड आल्याने जात होते. बोरवडे ...

One killed in Borwade after being hit by a tractor | ट्रॅक्टरला धडकून बोरवडेचा एकाचा मृत्यू

ट्रॅक्टरला धडकून बोरवडेचा एकाचा मृत्यू

Next

बोरवडे येथील संभाजी साठे हे आपल्या मोटारसायकलीवरून शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास मुदाळ तिट्ट्याकडील शेताकडे ऊसतोड आल्याने जात होते. बोरवडे गावच्या हद्दीत कुंभारवाडा वसाहतीजवळ गारगोटी-कोल्हापूर रस्त्याच्या कडेला सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली थांबली होती. अंधार असल्याने साठे यांची मोटारसायकल ट्रॉलीला जोरात जाऊन धडकली. यामध्ये साठे यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जोराचा मार बसला; तर मोटारसायकलीचेही मोठे नुकसान झाले. तत्काळ साठे यांना मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. साठे हे बिद्री येथील दूधसाखर विद्यानिकेतनमध्ये चतुर्थ वर्ग कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. युवराज मारुती साठे यांनी याबाबत मुरगूड पोलिसांत वर्दी दिली. संभाजी साठे यांच्या अपघाती निधनाने बिद्री, बोरवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, रस्त्यावर उभा असणारा ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा आहे, हे मात्र समजू शकले नाही.

Web Title: One killed in Borwade after being hit by a tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.