Kolhapur: हणमंतवाडी येथील एकाचा एकाचा भांडणातून खून; काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:47 AM2024-09-26T11:47:26+5:302024-09-26T11:47:46+5:30

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील बाजीराव यशवंत नरके (वय ५२, रा. मधली गल्ली) यांचा बुधवारी खून झाला. मंगळवारी ...

One killed in a brawl in Hanamantwadi Kolhapur | Kolhapur: हणमंतवाडी येथील एकाचा एकाचा भांडणातून खून; काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण 

Kolhapur: हणमंतवाडी येथील एकाचा एकाचा भांडणातून खून; काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण 

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील बाजीराव यशवंत नरके (वय ५२, रा. मधली गल्ली) यांचा बुधवारी खून झाला. मंगळवारी आणि बुधवारी काही लोकांनी त्यांना काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली. खुनाचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, बाजीराव हे आपल्या पत्नीसह गावात राहत होते. ते गावात मिळेल ते काम करून चरितार्थ करीत होते. दरम्यान, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि गावातील काही लोकांशी वारंवार भांडणे होत होते. मंगळवारीही वाद झाला. तेव्हा त्यांना मारहाण झाली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही पुन्हा वाद उफाळून आला. त्यांना मारहाण झाली. यामध्ये गंभीर जखमी होऊन ते बेशुद्ध पडले होते. ग्रामस्थांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.

Web Title: One killed in a brawl in Hanamantwadi Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.