कबनूरमध्ये दारू खरेदीसाठी एक किलोमीटर रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 04:30 PM2020-05-05T16:30:46+5:302020-05-05T16:32:06+5:30
यावेळी पोलीस व दुकानदाराकडून सोशल डिस्टन्स ठेवत, मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या याचे पालन करत सर्व मध्यपी रांगेत उभे राहून दारू खरेदी करत होते. यावेळी प्रत्येक ग्राहकाची थर्मल टेंपरेचर ने तपासणी करून व हातावर सॅनिटायझर देऊनच सोडले जात होते.
कबनूर - (कोल्हापूर) : येथील साखर कारखाना रोडवर असणाऱ्या एम लिकर्स समोर सकाळी दुकान चालू होण्यापूर्वी मध्यप्रेमीनी साखर कारखानाच्या दिशेने एक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या पोलीस व मध्य विक्रेत्याने दिलेल्या सूचनांचे पालन करत मध्य खरेदी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दारू विक्रीचे सर्व दुकाने बंद होती. यामध्ये शिथिलता मिळणार असून सोमवारी लींकर दुकान चालू होणार म्हणून बरेच मध्यपी दुकानाच्या आजूबाजूस घुटमळत होते. जिल्हाधिकार्यांचा आदेश नसल्याने सोमवारी दुकाने सुरू झाले नाहीत. मंगळवारी येथील साखर कारखाना रोडवरील एम लिकर सुरू झाले.
यावेळी पोलीस व दुकानदाराकडून सोशल डिस्टन्स ठेवत, मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या याचे पालन करत सर्व मध्यपी रांगेत उभे राहून दारू खरेदी करत होते. यावेळी प्रत्येक ग्राहकाची थर्मल टेंपरेचर ने तपासणी करून व हातावर सॅनिटायझर देऊनच सोडले जात होते. प्रत्येक ग्राहकाला मर्यादित दारू विक्री केली जात होती. गोंधळ व गर्दी होऊ नये म्हणून पोलिस व पोलीस मित्र दक्षता घेत होते.