घोडावत शिक्षण संकुलाच्या स्टुडन्ट फाउंडेशनकडून कस्तुरी सावेकर हिला एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:01+5:302021-05-27T04:26:01+5:30

कस्तुरी ही घोडावत ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी (सायन्स) वर्गात सध्या शिकत आहे. इयत्ता अकरावीमध्ये असताना तिने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा ...

One lakh donation to Kasturi Savekar from Student Foundation of Ghodavata Education Complex | घोडावत शिक्षण संकुलाच्या स्टुडन्ट फाउंडेशनकडून कस्तुरी सावेकर हिला एक लाखाची मदत

घोडावत शिक्षण संकुलाच्या स्टुडन्ट फाउंडेशनकडून कस्तुरी सावेकर हिला एक लाखाची मदत

googlenewsNext

कस्तुरी ही घोडावत ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी (सायन्स) वर्गात सध्या शिकत आहे. इयत्ता अकरावीमध्ये असताना तिने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्धार केला होता; परंतु घरची परिस्थिती बिकट असल्याने तिच्या या निर्धाराला आर्थिक आधाराची गरज होती. घोडावत विद्यापीठात आयोजित विविध कार्यक्रमात तिने मदतीचे आवाहन केल्यावर विद्यार्थ्यांनी तिला आर्थिक मदतीचा हात दिला. तिचे हे स्वप्न पाहून उद्योगपती संजय घोडावत यांनी अकरावी आणि बारावीची फी माफ करून तिच्या स्वप्नरूपी पंखांमध्ये बळ देण्याचे काम केले. घोडावत शिक्षण संकुलाचे योग्यवेळी पाठबळ मिळाल्यामुळे तिने मागे वळून पाहिले नाही. त्याचे फलित आज ती एव्हरेस्टच्या तिसऱ्या कॅम्पमध्ये यशस्विरीत्या पोहोचली आहे. लवकरच एव्हरेस्ट सर करणारी कोल्हापूरची पहिली महिला गिर्यारोहक ठरणार आहे.

प्रतिक्रिया

कस्तुरी ही खूप आहे. एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पाहणारी आणि ती सत्यात उतरवणारी कोल्हापूरची ती खऱ्या अर्थाने हिरकणी आहे. हे शिखर लवकर सर करून देशातील तरुणाईसाठी आयडॉल बनणार आहे. तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.

-संजय घोडावत, उद्योगपती.

चौकट

सामाजिक भान जपले

संजय घोडावत फाउंडेशन नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांना मदत करते. फाउंडेशनने आतापर्यंत दिव्यांगांच्या शाळा, पूरग्रस्त, अनाथालये, कोरोना रुग्ण, दुष्काळग्रस्त शेतकरी, वृद्धाश्रमे, शहीद जवानांचे कुटुंब, आरोग्य केंद्रे, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय खेळाडू, गरीब गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक भान जपले आहे.

Web Title: One lakh donation to Kasturi Savekar from Student Foundation of Ghodavata Education Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.