पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना एक लाख मास्क वाटप अभियान राबविणार : प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:58+5:302021-04-10T04:23:58+5:30

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस ‘रक्तदान सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाचा ...

One lakh masks will be distributed to the needy on the occasion of Guardian Minister's birthday: No direct wishes will be accepted | पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना एक लाख मास्क वाटप अभियान राबविणार : प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना एक लाख मास्क वाटप अभियान राबविणार : प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस ‘रक्तदान सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्याबरोबर ‘मी मास्क वापरतोय, तुम्हीसुद्धा वापरा’ या अभियानांतर्गत गरजूंना एक लाख मास्क वाटप करण्यात येणार असल्याची माहिती वाढदिवस समितीने दिली आहे. यंदा कोरोनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील हे प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत .

पालकमंत्री पाटील हे आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी शुभेच्छाच्या स्वरूपात वह्या स्वीकारून साजरा करतात. २००७ सालापासून सुरू केलेल्या या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमधील १४ लाख विद्यार्थ्यांना ६५ लाख वह्या वाटप केल्या आहेत. यंदाही १२ एप्रिलपासून अजिंक्यतारा कार्यालय येथे वह्या संकलनसुद्धा करण्यात येणार आहे पण त्यांचा वाढदिवस हा शासनाच्या नियमांचे पालन करून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

सध्या रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात स्वतः रक्तदान केले होते . हा उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी १२ एप्रिलपासून कार्यकर्त्यांच्यावतीने रक्तदान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याबरोबरच मास्क वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. भाजीपाला, फळे विक्रेते, रस्त्यावर व्यवसाय करणारे लोक अशा गरजूंना एक लाख मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. लोकांनी गर्दी न करता आपल्या सोयीनुसार १२ एप्रिलनंतर आठवडाभर आपल्या सोयीने अजिंक्यतारा कार्यालय येथे वह्या संकलित कराव्यात, असेही पत्रकात म्हटले आहे.

Web Title: One lakh masks will be distributed to the needy on the occasion of Guardian Minister's birthday: No direct wishes will be accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.