व्यापाऱ्याला एक लाखाचा आॅनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:34 PM2019-10-05T14:34:34+5:302019-10-05T14:35:40+5:30
क्रेडिट कार्ड व पेटीएम रजिस्टर करून देतो असे सांगून आधार कार्डद्वारे हॅकर्सनी व्यापाºयाच्या बँक खात्यावरील ९९ हजार ९७४ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अंकितकुमार शर्मा या भामट्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर : क्रेडिट कार्ड व पेटीएम रजिस्टर करून देतो असे सांगून आधार कार्डद्वारे हॅकर्सनी व्यापाºयाच्या बँक खात्यावरील ९९ हजार ९७४ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अंकितकुमार शर्मा या भामट्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले, गिरीश कल्होजीराव शिंदे (वय ४९, रा. राजेंद्रनगर) यांचा कारखाना आहे. कारखान्यात होणाºया आर्थिक व्यवहारांची रक्कम ते बँकेत जमा करतात. १६ सप्टेंबरला त्यांच्या मोबाईलवर फोन आला, ‘मी अंकितकुमार शर्मा बोलतोय. तुमचे क्रेडिट कार्ड व पेटीएम रजिस्टर करून देतो,’ असे त्याने सांगितले. त्याने सलग दोन दिवस फोन करून शिंदे यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून आधार कार्ड नंबर घेऊन त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेतला. त्यानंतर काही वेळातच शिंदे यांच्या सारस्वत बँक, शाखा राजारामपुरी येथील खात्यावरून ९९ हजार ९७४ रुपये खाता बुक मुंबई या खात्यावर आॅनलाईन वर्ग केले.
पैसे वर्ग झाल्याचा संदेश शिंदे यांना आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित शर्मा याचे मोबाईल बंद आहेत. सायबर शाखेकडून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे पुढील तपास करीत आहेत.