उजळाईवाडीच्या असोबा देवास एक लाखाची पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:49+5:302021-04-10T04:23:49+5:30
उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री असोबा देवालयास ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून १ लाख रुपयांची पालखी वाहण्यात आली. ...
उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री असोबा देवालयास ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून १ लाख रुपयांची पालखी वाहण्यात आली. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गोळा केलेल्या रकमेतून ही पालखी केली असून, त्यासाठी एक लाख १० हजार रुपये खर्च आला आहे. या पालखीचे पूजन व अभिषेक सरपंच सुवर्णा माने यांच्या हस्ते करण्यात आले.
देवाच्या पालखीवर सुबक नक्षीकाम केले आहे. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काही निवडक ग्रामस्थ व मंदिराचे पुजारी यांनी (सुरक्षित अंतर राखून) पूजन केले. गावकऱ्यांनी घरातूनच पालखीपूजन करून दारातूनच पालखीला लांबून नमस्कार केला. शंखनाद, घंटानाद, ढोल, गजर करीत देवाजवळ देशावरील कोरोना संकट टळावे, अशी प्रार्थना केली.
लोकवर्गणीतून पालखीसाठी ग्रामस्थांनी सामाजिक जाणिवेचे भान ठेवून सामाजिक सौहार्दाचे उदाहरण घालून दिले आहे.
०९ असोबा देवालय पालखी
फोटो ओळ:
उजळाईवाडी येथील श्री असोबा देवालयास लोकवर्गणीतून एक लाख रुपयांची पालखी वाहण्यात आली. (छाया : मोहन सातपुते)