‘कोल्हापूर दक्षिण’मधून पंचगंगा स्मशानभूमीला एक लाख शेणी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:46+5:302021-05-11T04:23:46+5:30
सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल, तसेच कोविड सेंटरमध्ये मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण ...
सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल, तसेच कोविड सेंटरमध्ये मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण जिल्हा, बाहेरील रुग्णाचे मृतदेह असतात. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तुलनेने ज्यादा शेणी लागतात. या शेणी विकतत घ्यायचे म्हटले तरीसुद्धा जे शेणी पुरवठादार आहेत. त्यांच्याकडून त्या प्रमाणात शेणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आपणा सर्वांच्या सहकार्याने आपल्या गावातून शेणी गोळा करून पंचगंगा स्मशानभूमीला देणे ही काळाची गरज आहे.
यासाठी आपण आपल्या गावातील सर्व संस्था आणि तरुण मंडळे, महिला बचतगट यांच्या सहकार्याने आपल्या गावातून जास्तीत जास्त शेणी गोळा करून त्या स्मशानभूमीला द्याव्यात. अडचणीच्या काळात आपण केलेली ही मदत माणुसकीचा धागा घट्ट करणारी ठरणार आहे. या अडचणीच्या काळात प्रत्येक घरातून नक्की किमान पाच शेणी मिळू शकतात. त्यासाठी गावपातळीवर लोकांना याची माहिती देणे, प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.
चौकट
तरुण मंडळांनी पुढे यावे
तरुण मंडळांनी या कामासाठी पुढे यावे. शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला येणार आहे, असे भावनिक आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.