Kolhapur: भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, कोल्हापूरचा एकजण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:28 IST2024-04-10T13:27:36+5:302024-04-10T13:28:50+5:30
कसबा तारळे : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) जवळील घाटात मंगळवारी सायंकाळी राधानगरीकडून कोल्हापूरला भरधाव वेगात निघालेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण ...

Kolhapur: भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, कोल्हापूरचा एकजण जागीच ठार
कसबा तारळे : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) जवळील घाटात मंगळवारी सायंकाळी राधानगरीकडून कोल्हापूरला भरधाव वेगात निघालेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात निवास ज्ञानदेव मोहिते (वय ४९, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) हे जागीच ठार झाले, तर विनायक आनंदा घोटणे (रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) हे जखमी झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : निवास मोहिते हे मंगळवारी सायंकाळी आपल्या मित्रांसह कारमधून (एम एच ०८ झेड ७३७१) राधानगरीकडून कोल्हापूरकडे निघाले होते. खिंडी व्हरवडेनजीक असणाऱ्या घाट रस्त्यावरून येत असताना चालक प्रशांत बाळासाहेब माने (वय ४०, सध्या रा. बालिंगा, ता. करवीर, मूळगाव चोकाक, ता. हातकणंगले) यांचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. या अपघातात निवास मोहिते हे जागीच ठार झाले, तर विनायक घोटणे जखमी झाले.
याबाबतची फिर्याद मृत मोहिते यांचे पुतणे जयवंत सुनील मोहिते (रा. कोल्हापूर) यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली.