कोल्हापूर-गारगोटी मार्गावर मोटरसायकल-ट्रकचा भीषण अपघात, एकजण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:38 AM2022-11-12T11:38:00+5:302022-11-12T11:38:21+5:30

अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.

One person killed in motorcycle-truck accident on Kolhapur Gargoti road | कोल्हापूर-गारगोटी मार्गावर मोटरसायकल-ट्रकचा भीषण अपघात, एकजण ठार

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर मोटरसायकल-ट्रकचा भीषण अपघात, एकजण ठार

googlenewsNext

गारगोटी : कोल्हापूर-गारगोटी मार्गावर कूरनजीक मोटरसायकल आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. विनोद शामराव सावंत (वय ४२, रा . शिंदेवाडी, ता. भुदरगड जि. कोल्हापूर) असे मृतांचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल, शुक्रवारी (दि ११) संध्याकाळी सातच्या सुमारास विनोद सावंत हा मोटरसायकलवरून कामानिमित्त कोल्हापूरकडे जात होता. तर उसाने भरलेला ट्रक बिद्री साखर कारखान्याकडे चालला होता. गारगोटी-कोल्हापूर महामार्गावर कूर येथे मोटरसायकल व ट्रकचा अपघात झाला. या अपघातात विनोद सावंत हा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.

विनोद हा डोझरवर चालक म्हणून काम करीत होता. सद्या त्याचे तामिळनाडू येथे काम सुरू आहे. तो घरगुती कामानिमित्त गावी आला होता. पण त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: One person killed in motorcycle-truck accident on Kolhapur Gargoti road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.