रस्त्यावर थुंकल्यास हजार, मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 02:33 PM2021-03-29T14:33:52+5:302021-03-29T14:36:21+5:30
CoronaVirus collector Kolhapur- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल पर्यंत रात्री बारावाजेपर्यंत वाढविण्यात आहे. याअंतर्गत रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असून या काळात चित्रपटगृह, मॉल्स, उपहारगृहे, सभागृह बंद राहतील. तसेच मास्क न घातल्यास पाचशे रुपये व रस्त्यावर थुंकल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी दिले.
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल पर्यंत रात्री बारावाजेपर्यंत वाढविण्यात आहे. याअंतर्गत रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असून या काळात चित्रपटगृह, मॉल्स, उपहारगृहे, सभागृह बंद राहतील. तसेच मास्क न घातल्यास पाचशे रुपये व रस्त्यावर थुंकल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी दिले.
रात्रीच्या जमावबंदी काळात हॉटेल्सची घरपोच सेवा व घेवून जाण्यास परवानगी राहील. मात्र सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी असेल. सभागृह, नाट्यगृहांमध्येही हे कार्यक्रम घेता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कोरोना संसर्ग असेपर्यंत सबंधित सिनेमा हॉल, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट, मालमत्ता बंद केले जातील. तसेच दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल.
सरकारी कार्यालयांमधील गर्दी कमी करण्यासाठी, लोकप्रतिनिधींव्यतिरीक्त, अतिमहत्वाची कामे नसलेल्या अभ्यागतांना शासकीय कार्यालयात येण्यास परवानगी असणार नाही. तसेच बैठकीसाठी बोलावण्यात आलेल्या अभ्यागतांना विभागाचे पत्र असल्याशिवाय बैठकीस प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार धर्मिक स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश द्यावा. तसेच दर्शनासाठी भेट देण्यासाठी ऑनलाइन आरक्षण सारख्या सुविधा द्यावी. सार्वजनिक वाहतुकीस अटी व शर्तींचा आधारे परवानगी देण्यात आलेली आहे.
---
नियम असे
- जिल्ह्यात रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
- वरील वेळेत चित्रपटगृह, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट बंद राहतील मात्र घरपोच सेवा सुरू राहील.
- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी
- लग्न कार्यासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
---
अन्यथा संस्थात्मक केंद्रात रवानगी
बाधीत व्यक्तीचे घरातच अलगीकरण केल्यास दाराच्या दर्शनी भागात गृहअलगीकरणााचा फलक व व्यक्तीच्या हातावर शिक्का मारावा. या नियमाचे उल्लंघन झाल्यास व्यक्तीची तात्काळ त्याची रवानगी संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी केली जाईल. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींनी शक्यतो बाहेर न पडावे, तसेच मास्कचा वापर करावा.