शिवराज्याभिषेक दिनी एक हजार वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:35+5:302021-06-04T04:18:35+5:30
कोल्हापूर : मदत फाउंडेशन, सह्याद्री देवराई व शिवराष्ट्र हायकर्सच्यावतीने जागतिक पर्यावरण व शिवराज्याभिषके दिनाचे आैचित्य साधून उद्या शनिवारी ...
कोल्हापूर : मदत फाउंडेशन, सह्याद्री देवराई व शिवराष्ट्र हायकर्सच्यावतीने जागतिक पर्यावरण व शिवराज्याभिषके दिनाचे आैचित्य साधून उद्या शनिवारी व रविवारी असे दोन दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी वैविध्यपूर्ण एक हजार वृक्षांचे रोपण माेहीम राबविली जाणार आहे. वृक्षप्रेमी मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण चळवळ राबविली जात आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या, शनिवारी अल्लंप्रभू डोंगर आळते (ता. हातकणंगले) येथे वृक्षारोपण केले जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रविवारी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले पन्हाळगडावरील बीएसएनल टाॅवरलगत वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यांनतर गोकूळ शिरगाव येथे होणार आहे. या उपक्रमात कोल्हापूर पीडियाट्रिक असोसिएशन, पन्हाळा नगरपालिका, कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, कोल्हापूर, सीए असोसिएशन, कंपनी सेक्रेटरी असोसिएशन, कोल्हापूर, जगद्गुरू अल्लंप्रभू योगपीठ, लिंगायत परीट समाज महासंघ, डाॅ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, गुरू गोरक्षनाथ गोशाळा आदींचा यात सहभाग आहे. या चळवळीत अनेक व्यक्ती, संस्थांनाही सहभागी होऊन झाड दत्तक घेता येऊ शकते, अशी माहिती मदत फाउंडेशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिली.