एकमेकाकडे बघण्यातून महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:24 PM2019-02-04T13:24:52+5:302019-02-04T13:26:59+5:30

शिवाजी पेठेतील एका प्रसिद्ध महाविद्यालयासमोर एकमेकाकडे बघण्याच्या कारणातून युवकांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर दगड भिरकावल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, जुनाराजवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेताच दोन्ही बाजूच्या युवकांनी तेथून धूम ठोकली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या हाणामारीच्या प्रकाराने परिसरात तणाव पसरला.

In one of the two groups of college youths rada | एकमेकाकडे बघण्यातून महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत राडा

एकमेकाकडे बघण्यातून महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत राडा

Next
ठळक मुद्देमहाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत राडाशिवाजी पेठेतील घटना : एकमेकाकडे बघण्याचे कारण

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील एका प्रसिद्ध महाविद्यालयासमोर एकमेकाकडे बघण्याच्या कारणातून युवकांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर दगड भिरकावल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, जुनाराजवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेताच दोन्ही बाजूच्या युवकांनी तेथून धूम ठोकली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या हाणामारीच्या प्रकाराने परिसरात तणाव पसरला.

अधिक माहिती अशी, शिवाजी पेठ येथील एका महाविद्यालयात सोमवारी विद्यार्थ्यांची गर्दी होती. सकाळी अकराच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यानंतर सर्व युवक महाविद्यालयासमोर उभे होते. त्याठिकाणी दोन गटांत एकमेकाकडे बघण्यावरुन जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर युवक भिडल्याने गोंधळ उडाला.

परिसरातील रस्त्यावरील दगड एकमेकांच्या दिशेने भिरकावले गेले. या प्रकाराची माहिती पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांना समजताच त्यांनी पोलिसांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही बाजूच्या युवकांनी दिसेल त्या रस्त्याने पळ काढला.

पोलीस गेल्यानंतर पुन्हा या परिसरात युवक जमल्याने तणाव पसरला. या परिसरात रोज वर्चस्ववाद, वैयक्तिक हेव्याद्याव्यातून हाणामारीचे प्रकार घडत असतात. याबाबत मात्र जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
 

 

Web Title: In one of the two groups of college youths rada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.