कांद्याच्या दरात घसरण : बटाटा मात्र स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 03:13 PM2019-11-08T15:13:06+5:302019-11-08T15:15:20+5:30
गेल्या चार-पाच दिवसांपासून घाऊक बाजारात सरासरी पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली. कांद्याला किमान १५, तर कमाल ५० रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत दर राहिला. बटाट्याच्या दरात मात्र फारसा चढउतार दिसत नाही.
कोल्हापूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून घाऊक बाजारात सरासरी पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली. कांद्याला किमान १५, तर कमाल ५० रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत दर राहिला. बटाट्याच्या दरात मात्र फारसा चढउतार दिसत नाही.
अतिवृष्टीमुळे खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने तर काढणीला आलेला कांदा जाग्यावरच कुजला. त्यामुळे आवकेवर परिणाम होऊन दरात वाढ झाली. चार-पाच दिवसांपूर्वी घाऊक बाजारातकांदा ५०, तर किरकोळ बाजारात ७० रुपयांपर्यंत पोहोचला होता.
गेल्या आठवड्यात कोल्हापूर बाजार समितीत रोज चार हजार पिशव्यांची आवक होती. त्याचा दर सरासरी ३२ रुपये होता; पण त्यानंतर दरात वाढ होत गेली. आवक चार हजार पिशव्यांच्या खाली गेल्याने घाऊक बाजारात सरासरी ५० रुपये किलोपर्यंत दर गेला; पण बुधवार (दि. ६) पासून कांद्याच्या दरात हळूहळू घसरण सुरू असून बुधवारी ६८५२ पिशव्यांची आवक झाली.
दर प्रतिकिलो १५ ते ५२ रुपयांपर्यंत राहिला असला तरी सरासरी दर ३५ रुपयांवर आला. गुरुवारी कोल्हापूर बाजार समितीत ६३८५ पिशव्यांची आवक झाली. दर किमान १५, तर कमाल ५० रुपये राहिला; पण सरासरी दर ३० रुपयांपर्यंत खाली आला. बटाट्याचा दर मात्र स्थिर राहिला आहे. आवक गेल्या आठवड्यापेक्षा थोडी वाढली असली तरी सरासरी दर १५ रुपयांपर्यंत राहिला आहे.
गेल्या चार दिवसांतील कांद्याचा दरदाम असा-
नोव्हेंबर आवक पिशवी सरासरी दर
४ ७६ २७ ४५
५ ५६ ७६ ४५
६ ६८ ५२ ३५
७ ६३ ६५ ३०