दहा हजार पतपुरवठ्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:51 PM2020-07-04T17:51:27+5:302020-07-04T17:53:17+5:30
लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांसमोर कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. यामधून फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा केला जात असून, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा केली आहे. कमी व्याजदरात आणि अनुदानही मिळणार असल्याने फेरीवाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांसमोर कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. यामधून फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा केला जात असून, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा केली आहे. कमी व्याजदरात आणि अनुदानही मिळणार असल्याने फेरीवाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
फेरीवाल्यांच्या आत्मनिर्भर निधी योजनासंदर्भात शनिवारी पी. एम. स्वनिधी कार्यकारी समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, २४ मार्च २०२० पूर्वी व्यवसाय असणारे योजनेसाठी पात्र आहेत. संबंधित फेरीवाले इस्टेट विभागाकडून शिफारसपत्र घेऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी शासनाची pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर जाऊन कर्जासाठी अर्ज करावा.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे , फेरीवाल्यांचे प्रतिनिधी दिलीप पोवार, आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, मायक्रो फायनान्सचे प्रतिनिधी अक्षय जोशी, नीलेश गावडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, ह्यएनयूएलएमह्णचे अधिकारी रोहित सोनुले, निवास कोळी उपस्थित होते.