गावशिवार साहित्य चळवळीच्या ऑनलाइन व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:30+5:302021-06-05T04:18:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गावशिवार साहित्य चळवळ गारगोटी यांच्यावतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेस रसिकांचा भरभरून ...

Online lecture series of Gavshivar Sahitya movement | गावशिवार साहित्य चळवळीच्या ऑनलाइन व्याख्यानमाला

गावशिवार साहित्य चळवळीच्या ऑनलाइन व्याख्यानमाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गारगोटी :

भुदरगड तालुक्यातील गावशिवार साहित्य चळवळ गारगोटी यांच्यावतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेस रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

शुक्रवार दिनांक २८ मे ते रविवार ३० मे या तीन दिवसांच्या कालावधीत ही व्याख्यानमाला संपन्न झाली. रंग कवितेचे विषयावर वक्ते- मुंबई येथील कवी अरुण म्हात्रे यांनी, भुदरगडची साहित्य चळवळ या विषयावर वक्ते-प्रा. चंद्रशेखर कांबळे यांनी तर ‘शिक्षणाची प्रयोगभूमी...भुदरगड’, या विषयावर वक्ते-शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी व्याख्यान दिली.

ही तिन्ही व्याख्याने माहितीपूर्ण झाली

व्याख्यानमालेचे पहिले काव्यपुष्प ‘रंग कवितेचे’ या विषयावर कवी आणि वक्ते अरुण म्हात्रे यांनी गुंफले. नारायण सुर्वे यांची कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. यासोबतच डोंगरी शेत ही कविता सादर केली. पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं सांगणारी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता सादर केली. तर चंद्रशेखर कांबळे यांनी भुदरगड तालुक्यात रुजलेली साहित्य चळवळ विशद केली. दीपक मेंगाने यांनी प्राथमिक शिक्षणाने अनेक प्रयोग यशस्वी करून राज्यात पथदर्शी तालुका होण्याचा बहुमान मिळवला हे सांगितले.

सहभागी व्याख्यात्यांसह गावशिवार परिवाराकडून सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कविवर्य गोविंद पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Online lecture series of Gavshivar Sahitya movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.