सत्यनारायणापासून तेराव्यापर्यंत ऑनलाइन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:23+5:302021-06-23T04:17:23+5:30

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात सत्यनारायण, लक्ष्मीपूजन, व्रताची सांगता अशा मंगलमयी सोहळ्यांपासून ते अगदी एखाद्या व्यक्तीचे निधन ...

Online from Satyanarayana to Thirteenth .. | सत्यनारायणापासून तेराव्यापर्यंत ऑनलाइन..

सत्यनारायणापासून तेराव्यापर्यंत ऑनलाइन..

Next

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात सत्यनारायण, लक्ष्मीपूजन, व्रताची सांगता अशा मंगलमयी सोहळ्यांपासून ते अगदी एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर करण्यात येणाऱ्या विधी ऑनलाईन पद्धतीने केल्या जात आहेत. कोल्हापुरात ऑनलाईन पद्धतीने विवाह सोहळे झाले नसले तरी अन्य विधी मात्र व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल, यूट्यूब, झूम-गुगल मीट अशा विविध समाज माध्यमांद्वारे पार पाडले जात आहेत.

गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक सोहळ्यांवर मर्यादा आल्या आहेत. विवाह समारंभ २५ माणसात तर बारसं, जावळ, सत्यनारायण असे अन्य विधी घरगुती पद्धतीने साजरे केले जात आहेत. संसर्गाच्या भीतीने सगळ्यांना एकत्र येता येत नसल्याने त्यावर पर्याय काढत व्हर्च्यूअल उपस्थिती लावली जात आहे. दुसरीकडे ज्यांच्या पौरोहित्याखाली व मार्गदर्शनाने हे विधी पार पाडले जातात. त्या गुरूजींनीदेखील या नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करत ऑनलाईन पद्धतीने हे सोहळे पार पाडण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात असे व्हर्च्यूअल पद्धतीने कार्यक्रम व विधी पार पाडले जात आहेत. कोल्हापुरात अशा विवाह सोहळ्यांचे प्रमाण नाही मात्र अन्य देवता कृत्ये, व्रत वैकल्य व अन्य पूजाविधी, पाठ ऑनलाईन केले जात आहेत.

---

पुजेला आले तरी मास्क

विवाह किंवा वास्तुशांत असे होमहवनाचे व मोठे विधी ऑनलाईन पद्धतीने करणे अवघड असते. अशावेळी प्रत्यक्ष जावूनच विधी पार पाडले जातात, हे करताना कुटुंबीय आणि गुरुजी दोघांकडूनही फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाते. पुजेला आले तरी गुरुजींच्या तोंडावर मास्क असतो. शिवाय यजमान कुटूंबाकडून पाणी, चहा किंवा अन्य काही खाद्यपदार्थांचे सेवन केले जात नाही.

--

विवाहासारखे मोठे विधी ऑनलाईन होत नाहीत. मात्र सत्यनारायण पूजा, सोळा सोमवार, अनघादत्त व्रत अशा व्रतांचे विधी किंवा उद्यापन, लक्ष्मीपूजन हे सोहळे पार पाडता येतात. त्यासाठी आधीच कुटुंबाला साहित्यांची यादी पाठवली जाते, पूजेच्या मांडणीचा व्हिडीओ, छायाचित्र पाठवले जाते. विधीच्यावेळी सांगितल्याप्रमाणे मांडणी व्यवस्थित झाली आहे का, ऐनवेळी लागणारे साहित्य हे पाहूनच मग विधी सुरू केले जातात.

वेदमूर्ती सुहास जोशी

--

दुर्गा सप्तशतीचे पाठ, रामरक्षा, गणपती स्रोत्र, देवतांचे श्लोक असे पाठ व विधी आम्ही ऑनलाईन घेत आहाेत. घरात स्मार्ट टिव्ही, लॅपटॉप किंवा काॅम्प्युटर असेल तर त्याला मोबाईल कनेक्ट करुन बसायला सांगतो त्यामुळे लक्ष केंद्रित होतेे आणि सगळ्यांना या विधीचा आनंददेखील घेता येतो. नेटवर्क आणि कनेक्टिविटी किती आहे यावर हे अवलंबून असते.

साईप्रसाद बाखरे

---

Web Title: Online from Satyanarayana to Thirteenth ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.