शिक्षणाला ‘ऑनलाईन’ आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:15+5:302021-03-23T04:25:15+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्यावर्षी जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे मार्च ते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्राथमिक ते उच्चशिक्षणापर्यंतची पावले अडखळली. स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा ...
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्यावर्षी जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे मार्च ते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्राथमिक ते उच्चशिक्षणापर्यंतची पावले अडखळली. स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा असलेल्या मोबाईल, लॅपटॉप, संगणक या डिजिटल साधनांमुळे एप्रिलच्या अखेरीपासून शिक्षणाची पावले पडू लागली. महिन्यागणिक त्याची गती वाढली.
जिल्ह्यातील १,७०० तंत्रस्नेही शिक्षकांनी गुगल मिट, झूम, यू-ट्युब, ब्लॉग आदी नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले. त्यांनी अभ्यासक्रमातील विविध विषयांचे दहा हजार व्हिडीओ तयार करून ते विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राने विविध विषयांचे सुमारे ५०० ऑनलाईन व्हिडीओ तयार करून ते विद्यार्थ्यांना दिले. आठ महिने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहिले. नेटवर्क, स्मार्टफोन उपलब्धता, आदी तांत्रिक अडचणींचा सामना करत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. पुढे हळूहळू ऑनलाईनवरून ऑफलाईन पद्धतीकडे शिक्षणपद्धती आली. कोरोनाने गेल्या वर्षभरात शैक्षणिक क्षेत्राला काही प्रमाणात फटका बसला असला, तरी बदलत्या जगाबरोबर वाटचाल करण्यासाठी पहिली ते पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीचा एक नवा आधारदेखील उपलब्ध झाला.