कोल्हापूर गणेशोत्सवाचे ऑनलाईन दर्शन : महापालिकेचे ॲप कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:32+5:302021-09-08T04:30:32+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका व सेवा इन्फोटेक यांच्यावतीने कोल्हापूर गणेशोत्सव २०२१ चे ऑनलाईन दर्शन बुधवारपासून सुरु करण्यात येत आहे. ...
कोल्हापूर : महानगरपालिका व सेवा इन्फोटेक यांच्यावतीने कोल्हापूर गणेशोत्सव २०२१ चे ऑनलाईन दर्शन बुधवारपासून सुरु करण्यात येत आहे. ‘ईझी कोल्हापूर’ ॲप डाऊनलोड करुन सर्वांना ऑनलाईन गणेशोत्सव सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन ॲप मंगळवारी दुपारी उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त चेतन कोंडे यांच्या हस्ते कार्यान्वीत करण्यात आले आहे. यावेळी सेवा इन्फोटेकचे जयराज चव्हाण उपस्थित होते.
ईझी कोल्हापूर ॲप व डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.ईझी कोल्हापूर.कॉम या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती अपलोड करावयाची आहे. त्याचबरोबर घरगुती आरासची देखावे ही आपल्याला या ॲपमध्ये अपलोड करता येणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या मंडळ, तालीम संस्था यांना या ॲपद्वारे नोंदणी करता येणार आहे.
शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या या ॲपद्वारे गणेशोत्सवचे ऑनलाईन दर्शनाची सुविधा नागरिकांनी घेऊन रस्त्यावरील गर्दी कमी करावी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.