श्रीपतराव महाविद्यालयात आॅनलाइन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:28+5:302021-06-05T04:17:28+5:30
अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्या श्रीमती डॉ. व्ही. पी. पाटील होत्या. शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्या श्रीमती डॉ. व्ही. पी. पाटील होत्या.
शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी श्रीमती सुनीता नाशिककर म्हणाल्या, स्त्रीला जन्मापासूनच नाकारले जाते व मुलगाच वंशाचा दिवा समजला जातो. मात्र हळूहळू या विचारात परिवर्तन घडून येत आहे. लोकशाहीमुळे विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांना संधी मिळत आहे. यशस्वीपणे काम करीत आहे. स्त्रीने स्वतःला दुर्बल न समजता येणाऱ्या संकटाचा प्रतिकार केला पाहिजे. पुरुषांनी फक्त ८ मार्च महिला दिन साजरा करू नये. तर सदासर्वदा साजरा केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. शहाजी लॉ कॉलेजच्या प्रा. ज्योती शेटे म्हणाल्या, महिलांनी प्रथम कायद्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. संविधानाने स्त्री -पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. यावेळी त्यांनी स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधीचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कायद्यांची माहिती दिली. स्त्रियांच्या बाबतीत समाजामध्ये असणाऱ्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. सजग मन तयार करण्यासाठी लहानपणापासून मूल्यशिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.