शासकीय कार्यालयांत आता १५ टक्केच कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:05+5:302021-04-23T04:26:05+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांतर्गत आता राज्य, केंद्र व स्थानिक प्राधिकरणाच्या शासकीय कार्यालयांमध्ये ...
कोल्हापूर : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांतर्गत आता राज्य, केंद्र व स्थानिक प्राधिकरणाच्या शासकीय कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी हे आदेश काढले असून, त्यातून कोविड संसर्ग व्यवस्थापनाशी निगडीत सेवांना सूट देण्यात आली आहे.
या आदेशानुसार लग्न समारंभदेखील एका हॉलमध्ये २ तासांत आणि २५ लोकांच्या उपस्थितीत करता येईल. या नियमाचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंड लावण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रवासी वाहतूक ५० टक्के क्षमतेसह अत्यावश्यक सेवांसाठी व फक्त शहराअंतर्गत मर्यादीत असेल. खासगी बसेस ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पॅरामेडिकल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रुग्णालय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारावर सार्वजनिक वाहनाचा वापर करता येणार आहे.
---