कोल्हापुरात केवळ १८६ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:25+5:302021-07-05T04:16:25+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाकडील कोविशिल्ड लसीचा साठा संपला असून गेल्या सात दिवसांपासून प्रशासन लस पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहे. कोव्हॅक्सिनचे ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाकडील कोविशिल्ड लसीचा साठा संपला असून गेल्या सात दिवसांपासून प्रशासन लस पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहे. कोव्हॅक्सिनचे लसीकरण मात्र सुरू आहे.
शहरात रविवारी आठ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ६० वर्षांवरील १६२ नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर २४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. पहिला व दुसरा डोस मिळून १८६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई येथे २९, राजारामपुरी येथे ४८, पंचगंगा येथे १५, कसबा बावडा येथे १०, महाडीक माळ येथे १०, आयसोलेशन येथे २९, फुलेवाडी येथे २०, मोरे मानेनगर येथे २५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरात आतापर्यंत एक लाख २६ हजार ३४१ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर ५१ हजार ५७२ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
आज विद्यार्थी व दिव्यांगांचे लसीकरण -
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांनी लसीकरणासाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे आज, सोमवारी लसीकरणासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.