धरणांत फक्त २३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:39 AM2019-05-06T00:39:49+5:302019-05-06T00:39:53+5:30

नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उष्णतेच्या लाटेने झालेले बाष्पीभवन आणि निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे वाढविलेल्या विसर्गामुळे मे ...

Only 23 percent water stock in the dam | धरणांत फक्त २३ टक्के पाणीसाठा

धरणांत फक्त २३ टक्के पाणीसाठा

Next

नसिम सनदी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उष्णतेच्या लाटेने झालेले बाष्पीभवन आणि निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे वाढविलेल्या विसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्याची पिण्याची व पिकांची तहान भागविणाऱ्या चार मोठ्या धरणांतील पाणीसाठा आठवडाभरात तब्बल १०५ दशलक्ष घनमीटरने कमी झाला असून, आजच्या घडीला तो केवळ २३ टक्के उरला आहे. गतवर्षी याच वेळी ३९ टक्के साठा शिल्लक होता. नऊ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३७ टक्के पाणी शिल्लक राहिल्याने उपसाबंदीची कुºहाडही कोसळली आहे.
राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी यांसारखी चार मोठी धरणे आणि जोडीला नऊ मध्यम आणि ८५ लघु प्रकल्पांमुळे कोल्हापूर जिल्हा पाणीदार आहे. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ४० ते ५० टक्के साठा शिल्लक राहत होता. यावर्षी मात्र पावसाळ्यात सर्वच धरणे ओसंडून वाहूनसुद्धा उपलब्ध साठ्याची बचत करता आली नाही. याला प्रशासकीय गलथानपणा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्याचे भवितव्य हातात असणाºया चार मोठ्या धरणांतील पाणीसाठा तर आजवरच्या नीचांकावर पोहोचला असून, एकूण पाण्याच्या २५ टक्क्यांपेक्षाही साठा कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा हा साठा २८८.७९ दशलक्ष घनमीटरनी कमी झाला आहे. राधानगरी- १२, तुळशी- ७ , वारणा- २१, दूधगंगा १९ टक्के इतकी तूट गतवर्षीपेक्षाच्या तुलनेत दिसत आहे. त्यातच हवामान विभागाने मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे सांगितल्याने हे उपलब्ध पाणी जून महिनाअखेर म्हणून आजपासून दोन महिने पुरवून वापरणे हे पाटबंधारे विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. साहजिकच धरणातील विसर्ग, आवर्तन यांवर निर्बंध येत असून, उपसाबंदीही सुरू झाली आहे.
आज आंदोलनाचा धडाका
धरणातील साठा एक चतुर्थांशपेक्षाही कमी झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार असल्याने उपसाबंदी सुरू केली आहे; पण त्याची सर्वाधिक झळ पिकांना बसत असल्याने शेतकरी आक्रमक होत आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे नियोजन शेतकºयांनी केले आहे. आज, सोमवारी इरिगेशन फेडरेशन महावितरण व पाटबंधारे विभागाला जाब विचारणार आहे, तर इचलकरंजीचे कॉ. अप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी ते तेरवाड बंधाºयातील पाणी उपसा करण्यास परवानगी देण्यासाठी घेराओ घालणार आहेत.

मध्यम प्रकल्प पाणीसाठा
(दशलक्ष घनमीटरमध्ये )
धरण आजचा टक्केवारी मागील वर्षाची
टक्केवारी
कासारी २८.३७ ३६ ३६
कडवी ३५.१८ ५० ५४
कुंभी ३२.०४ ४२ ४३
पाटगाव ३४.५७ ३३ ३२
चिकोत्रा १८.१२ ४२ २२
चित्री १५.२२ २९ ३८
जंगमहट्टी ११.८७ ३५ ४३
घटप्रभा १८.०८ ४१ ५६
जांबरे ३.४६ १७ ३७
मोठ्या धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये)
धरण आजचा मागील गतवर्षी आजची मागील वर्ष
आठवडा आजचा टक्केवारी टक्केवारी
राधानगरी ६२.३३ ८०.६६ ८८.२९ २८ ४०
तुळशी ३९.३३ ४२.४३ ४५.९६ ४३ ५०
वारणा १७६.७६ २१९.३४ ३४०.२७ २३ ४४
दूधगंगा १२८.१६ १६९.४२ २२०.८५ १९ ३३
एकूण ४०६.५८ ५११.८५ ६९५.३७ २३ ३९

Web Title: Only 23 percent water stock in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.