अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करूनच बदलीची माहिती संकलित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:24 AM2021-04-18T04:24:12+5:302021-04-18T04:24:12+5:30

कुंभोज : जिल्ह्यांतर्गत बदलीसंदर्भात आधी अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करून मगच शिक्षकांकडून बदलीबाबतची माहिती संकलित ...

Only collect transfer information by declaring schools in difficult areas | अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करूनच बदलीची माहिती संकलित करा

अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करूनच बदलीची माहिती संकलित करा

Next

कुंभोज : जिल्ह्यांतर्गत बदलीसंदर्भात आधी अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करून मगच शिक्षकांकडून बदलीबाबतची माहिती संकलित करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.

बदलीच्या नवीन निकषांनुसार गठित करण्यात आलेल्या समितीकडून शाळांचे फेरसर्वेक्षण करून अवघड क्षेत्रातील शाळा घोषित कराव्यात, अशी निवेदनात प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय विषय शिक्षकांची विषयनिहाय यादी जाहीर करावी, प्रथमच संवर्ग १ व २ चा लाभ घेण्यासाठी सेवेची अट नसल्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, तसेच विज्ञान विषय शिक्षकांची पदोन्नती लवकर घ्यावी, अशा अन्य महत्त्वाच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस.के. पाटील आदींची स्वाक्षरी आहे.

Web Title: Only collect transfer information by declaring schools in difficult areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.