Corona vaccine -जिल्ह्यात दिवसभरात केवळ साडेचार हजार जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:33+5:302021-04-10T12:18:59+5:30
Corona vaccine Kolhapur-ज्या कोल्हापूर जिल्ह्यात अगदी दोन दिवसांपूर्वी ३६ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. त्याच जिल्ह्यात लसटंचाईमुळे शुक्रवारी केवळ ४ हजार ५३१ जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुबलक प्रमाणात लस आल्याशिवाय लसीकरणाची प्रक्रिया सुरू होणेे अवघड आहे.
कोल्हापूर : ज्या कोल्हापूर जिल्ह्यात अगदी दोन दिवसांपूर्वी ३६ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. त्याच जिल्ह्यात लसटंचाईमुळे शुक्रवारी केवळ ४ हजार ५३१ जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुबलक प्रमाणात लस आल्याशिवाय लसीकरणाची प्रक्रिया सुरू होणेे अवघड आहे.
आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी गटातील २९ कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ५४ जणांनी दुसरा डोस घेतला. फ्रंटलाइन वर्करनी १२६ जणांनी पहिला तर ११२ जणांनी दुसरा डोस घेतला.
४५ ते ६० वयोगटातील नागरिक गेल्या काही दिवसांत मोठ्या संख्येने लस घेत होते. मात्र, ती संख्या लसीअभावी कमालीची घटली असून दिवसभरात २७३६ जणांनी पहिला डोस तर ५४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील १२७३ नागरिकांनी पहिला तर १४७ ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.