सर्वांनी एकजुटीने काम केले, तरच देशाची आर्थिकस्थिती बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:46+5:302021-08-17T04:29:46+5:30

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्यावतीने ‘आर्थिक धोरणे व सद्यस्थिती’ या विशेष ऑनलाइन व्याख्यानमालेंतर्गत पहिले पुष्प गुंफताना ‘माझा जीवनकाळ’ या विषयावर ...

Only if everyone works together, the economic situation of the country will change | सर्वांनी एकजुटीने काम केले, तरच देशाची आर्थिकस्थिती बदलणार

सर्वांनी एकजुटीने काम केले, तरच देशाची आर्थिकस्थिती बदलणार

Next

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्यावतीने ‘आर्थिक धोरणे व सद्यस्थिती’ या विशेष ऑनलाइन व्याख्यानमालेंतर्गत पहिले पुष्प गुंफताना ‘माझा जीवनकाळ’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड न करता पुढे जायला हवे. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता उभे राहायला शिकले पाहिजे आणि जे कराल, त्यात सर्वश्रेष्ठ होण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. हे स्वतःच्याच आयुष्यातील अनेक उदाहरणे देऊन डॉ. जाधव यांनी सांगितले. सध्या ‘आंबेडकर आणि गांधी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना’ आणि ‘भारतातील जाती व अमेरिकेतील वंश’ ही तीन महत्त्वाची पुस्तके लिहीत असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. जाधव यांनी अत्यंत अभिनव आणि ओघवत्या शैलीत त्यांच्या जीवननुभवातून अनेक महत्त्वाचे धडे युवा पिढीला दिले असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, अर्थशास्त्र विभागाच्यावतीने दर आठवड्याला देश-विदेशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञांचे व्याख्यान होणार आहे.

चौकट

मोठे यश

भारतीय रिझर्व्ह बँक, इथिओपियातील सरकारचे आर्थिक सल्लागार, हवाला मार्केट अभ्यासासाठी दुबईला गुप्त भेट, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमधील साडेचार वर्षे आणि नॅशनल एडव्हायजरी कौन्सिल व नियोजन आयोगातील कारकीर्द याचा डॉ. जाधव यांनी सविस्तर आढावा घेतला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपदाच्या काळात ‘समर्थ भारत अभियाना’ची मुहूर्तमेढ रोवली. हेच अभियान आज ‘उन्नत भारत’ नावाने केंद्र सरकार चालविते आहे, हे मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

फोटो (१६०८२०२१-कोल-नरेंद्र जाधव (व्याख्यान)

160821\16kol_7_16082021_5.jpg

फोटो (१६०८२०२१-कोल-नरेंद्र जाधव (व्याख्यान)

Web Title: Only if everyone works together, the economic situation of the country will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.