महेश जाधवांना मराठा समाजच उत्तर देईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:46+5:302021-05-25T04:28:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पद गेल्यामुळे भ्रमिष्ट झालेले भाजपचे महेश जाधव हे मराठा आरक्षणातील आंदोलकांवर टीका करत आहेत. ...

Only Maratha community will answer Mahesh Jadhav | महेश जाधवांना मराठा समाजच उत्तर देईल

महेश जाधवांना मराठा समाजच उत्तर देईल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पद गेल्यामुळे भ्रमिष्ट झालेले भाजपचे महेश जाधव हे मराठा आरक्षणातील आंदोलकांवर टीका करत आहेत. त्यांना आम्ही उत्तर देणार नसून समाजच योग्यवेळी उत्तर देईल, असा पलटवार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला.

मराठा समाज आरक्षणाबाबत साेमवारी शिवाजी मंदिर, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत भाजपचे माजी महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई यांच्यावर मराठा आरक्षणाच्या आडून त्यांनी दुकानदारी बंद करावी, अशी टीका केली होती. याबाबत सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पद गेल्याने महेश जाधव हे भ्रमिष्ट झाले आहेत. दुकानदारी म्हणून त्यांनी आमचा नाहीतर मराठा समाजाचा अपमान केला आहे. अशा प्रवृत्तीला समाजच योग्यवेळी उत्तर देईल. ज्या पक्षाने न्यायालयात न टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले, त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

Web Title: Only Maratha community will answer Mahesh Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.